टी20 विश्वचषक 2024 नंतर भारतीय संघाते सध्याचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या नंतर राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून गाैताम गंभीरची निवड होणार असल्याचे बातम्या समोर आले आहेत. चाहत्यांमध्ये देखील गाैतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्याबाबत प्रचंड उत्साह आहे. परंतू अद्याप बीसीसीआयकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआय हलचालीतून असे दिसत आहे की, बोर्डाला गंभाीरच्या आयपीएलमधील त्याच्या कोचिंग आणि मेंटॉरशिपच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. गंभीर प्रशिक्षक होण्यापूर्वी, त्याची एकूण संपत्ती काय आहे आणि त्याच्याकडे किती मालमत्ता आहे हे जाणून घेऊया.
गाैतम गंभीर हा पिनॅकल स्पेशालिटी व्हेइकल्स, क्रिकप्ले आणि रॅडक्लिफ लॅबचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि या कंपन्यांमध्ये त्याचे शेअर्सही आहेत. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 25 दशलक्ष यूएस डॉलर आहे, जी भारतीय चलनात सुमारे 208 कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. त्याच्या कारकिर्दीत तो अनेक आयपीएल संघांसाठीही खेळला आहे. सुरुवातीला, दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2.9 कोटी रुपयांना विकत घेतले आणि 2011 मध्ये तो केकेआर फ्रँचायझीमध्ये सामील झाला. यापूर्वी केकेआर मध्ये त्याचा आयपीएल पगार 11 कोटी रुपये होता, पण 2012 आणि 2014 च्या यशानंतर त्याचा पगार 12.5 कोटी रुपये झाला. 2018 मध्ये निवृत्तीनंतर तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये क्रिकेट कॉमेंट्री करुनही कमाई करत आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील गौतम गंभीरहा एक दिग्गज खेळाडूपैकी एक आहे. त्याने 15 वर्ष भारतीय संघासाठी खेळला आहे. यादरम्यान त्याचा मोठ्या सामन्यांचा खेळाडू म्हणून उल्लेख केला गेला आहे. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची महत्तवपूर्ण खेळी खेळली होती. तर 2007 मध्ये टी20 विश्वचषकात फायनल मध्ये पाकिस्तान विरुद्ध 54 चेंडूत 75 धावांची महत्तवपूर्ण खेळी खेळली होती. भारतासाठी गंभीरने 147 वनडे सामन्यात 5238 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकल्या आहेत. याशिवाय त्याने 58 कसोटी सामन्यात 4154 धावा केल्या आहेत. त्याचा नावे कसोटी मध्ये 11 शतक आणि 22 अर्धशतके आहेत. तर टी20 मध्ये गंभीरने 37 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 932 धावा केल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की भोवली, बांगलादेशच्या खेळाडूवर आयसीसीची कठोर कारवाई
विराट-रोहितने भेट घेतलेले ‘ते’ महान क्रिकेटर नक्की आहे तरी कोण?
“हरिस, तू खंबीर राहा…आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत”; व्हायरल व्हिडिओवर शाहीन आफ्रिदीची प्रतिक्रिया