ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ७ जानेवारीपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. तसेच हा सामना ‘पिंक टेस्ट’ म्हणूनही ओळखला जाईल. पिंक टेस्टचा अर्थ या कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जाईल, असा नाही. तर या कसोटीतून स्तन कर्करोगाबाबत जागरूकता केली जाते, म्हणूनच या कसोटीच्या निमित्ताने सर्व स्टेडियम गुलाबी रंगाने रंगवले जाते.
नक्की काय आहे पिंक टेस्ट –
गेल्या १२ वर्षापासून सिडनी येथे दरवर्षी जानेवारीमध्ये होणारा कसोटी सामना पिंक टेस्ट म्हणून ओळखला जातो. भारत ऑस्ट्रेलियामध्ये होणारा कसोटी सामना हा १३ वा ‘पिंक टेस्ट’ सामना आहे.
खरंतर गेली १२ वर्षे क्रिकेट ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांच्या मॅकग्रा फाऊंडेशनला पाठिंबा देत आहे. हे फाऊंडेशन मॅकग्रा यांनी त्यांची पहिली पत्नी जेनसह २००५ साली चालू केले होते. पण त्यानंतर ३ वर्षांनी २००८ साली जेन यांचे स्तन कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे तिच्या स्मरनार्थ २००९ पासून सिडनीमध्ये जानेवारी महिन्यात होणारा कसोटी सामना हा पिंक टेस्ट म्हणून ओळखला जातो.
या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस जेन मॅकग्रा डे किंवा पिंक डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्तन कर्करोगाच्या जागरूकतेसाठी निधी उभा करुन मॅकग्रा फाउंडेशनला दिला जातो. हे फाउंडेशन स्तन कर्करोगाच्या जागरूकतेबरोबरच ऑस्ट्रेलियामध्ये ब्रेस्ट केयर नर्स यांच्या शिक्षणासाठीही पाठिंबा देते. या दिवशी प्रेक्षकही गुलाबी रंगाची वस्त्र परिधान करुन येतात.
पहिला ‘पिंक टेस्ट’
सन २००९ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला पिंक टेस्ट सामना खेळवला गेला होता. तेव्हापासून दरवर्षी जानेवारीमध्ये सिडनीत हा कसोटी सामना खेळवला जातो. शेवटची पिंक टेस्ट साल २०२० ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात झाली होती. त्यावेळी त्या कसोटीतून १.२ मिलियन डॉलर इतका निधी गोळा झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
केंद्रीय वित्त मंत्रालयाने टॅक्समध्ये सूट दिली नाही, तर बीसीसीआयला भरावे लागणार तब्बल ‘इतके’ कोटी
फलंदाजाने मारलेला चेंडू पडला थेट चाहत्यांच्या बियर ग्लासमध्ये, बघा विनोदी व्हिडिओ
‘हा’ ऑसी क्रिकेटर म्हणतो, सलामी सोबतच पेनच्या जागी विकेटकिपिंग करण्यासाठी देखील तयार