भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच दुखापतीचे ग्रहण दोन्ही संघांसाठी सुरू झाले होते. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व विल पुकोव्हस्कीला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यात मॅथ्यू वेडला सलामीला फलंदाजी करावी लागली. सलामीला फलंदाजी करताना वेडने 4 डावात 8,33,30 आणि 40 धावांची खेळी केली होती.
आता 7 जानेवारीला सिडनी येथे होणाऱ्या कसोटी सामन्याअगोदर पत्रकारांशी बोलताना वेड म्हणाला की , मी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार असतो.
वेड म्हणाला, “आम्हाला आशा आहे की वॉर्नर खेळेल. त्यामुळे वॉर्नरसोबत सलामीला मी असेल किंवा विल(पुकोव्हस्की), हे मला माहीत नाही. संघात बदल झाला असून बर्न्स बाहेर गेला आहे. तसेच विलचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे अंतिम संघात काय बदल होतात, तसेच मी कुठे खेळतो, अथवा खेळेल का नाही, हे देखील मला माहीत नाही.”
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगरबद्दल बोलताना वेड म्हणाला, “लॅंगर यांनी मला विचारले होते की, तू सलामीसाठी तयार आहेस का. त्यांनी माझ्यावर कुठलेही दडपण दिले नाही अथवा आदेश दिला नाही.”
पहिल्या दोन सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याबद्दल वेड पुढे म्हणाला, “माझ्या मते ती एक संधी होती, मला दाखवून द्यायचे होते की मी एक ते सात क्रमांकावर कोठेही फलंदाजी करू शकतो. मालिकेदरम्यान काही घडले तर मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मी टिम पेन ऐवजी यष्टीरक्षण देखील करू शकतो.”
तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियन संघात वॉर्नर, पुकोव्हस्की हे सलामीवीर परतले आहेत. तर भारतीय संघातही रोहित शर्मा परतला आहे. त्याचबरोबर दुखापतग्रस्त उमेश यादव ऐवजी टी नटराजनचाही भारताच्या कसोटी संघात समावेश झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघात अंतिम 11 जणांमध्ये बदल होणार, हे निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचा दावा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याकडूनही झाले नियमांचे उल्लंघन
सौरव गांगुलीची मुलगी सनाने दिली त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली…
मयंक अगरवालच्या अपयशाचे कारण सांगत ‘या’ दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला