---Advertisement---

असा झाला पाँटिंगचा ‘पंटर’, जाणून घ्या कारण

On: मंगळवार, जानेवारी 28, 2020 8:16 PM
---Advertisement---

आपण नेहमी पाहतो की क्रिकेेट जगतात कोणत्या ना कोणत्या खेळाडूला टोपणनाव ठेवण्यात येत असते. अर्थात ते अनेकदा संघसहाकाऱ्यांनीच दिलेले असते. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगलाही (Ricky Ponting) त्याच्या संघसहाकाऱ्यांनी ‘पंटर’ (Punter) हे टोपणनाव दिले होते. या टोपणनावाबद्दल पाँटिंगने खुलासा केला आहे. आजही त्याला अनेकदा पंटर या  टोपणनावानेच बोलावले जाते.

माझा संघसहकारी आणि फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) माझे टोपणनाव ठेवले आहे. मी कुत्र्यांच्या शर्यतीवर पैज (Bet On Dogs Race) लावत होते, म्हणून वॉर्नने माझे ‘पंटर’ हे टोपणनाव ठेवले होते, असे सोमवारी आपल्या टोपणनावाबद्दल पाँटिंगने खूलासा केला.

“1990 मध्ये क्रिकेट अकादमीत राहत असताना आम्हाला 40 अमेरिकन डॉलर्स मिळत होते. तेव्हा मी टीएबीमध्ये कुत्र्यांच्या शर्यतीवर पैज लावायचो. त्यावेळी वॉर्नने मला ‘पंटर’ हे टोपणनाव दिले होते,” असे ट्विटरवर चाहत्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पाँटिंग म्हणाला.

पाँटिंगची हा आतापर्यंत क्रिकेट खेळलेल्या उत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधारांमध्ये गणणा होती पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी (Australia) कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 168 कसोटी सामन्यात 13378 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 1995 ते 2012 या दरम्यान खेळलेल्या 375 वनडे सामन्यांत 13704 धावा केल्या आहेत.

तसेच पाँटिंगने 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 401 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 98 धावांचा समावेश आहे.

सध्या पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1222101191464644610

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---