---Advertisement---

WTC फायनलमध्ये पावसाने खोडा घातला तर कुणाला मिळणार ट्रॉफी? लगेच वाचा काय सांगतो नियम

On: मंगळवार, जून 6, 2023 11:59 AM
IND-VS-AUS-WTC-FINAL
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 जूनपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित केनिंग्टन ओव्हल मैदानावर या सामन्याचे आयोजन केले जाईल. दोन्ही संघांनी डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, लंडनच्या के ओव्हल मैदानात पाऊस झाला आणि सामना निकाली लागला नाही, तर काय होईल? याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर त्याबाबत जाणून घेऊयात.

सामन्यात पाऊस पडला, तर कशी होणार विजेत्याची निवड?
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पावसाबाबत आयसीसीने स्पष्ट नियम बनवले आहेत. जर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामना पाच दिवसात संपला नाही, तर यासाठी एक राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे, जो पंचांद्वारे लागू केला जाऊ शकतो. तरीही जर निकाल लागला नाही, तर स्पर्धेचे विजेतेपद दोन्ही संघांना संयुक्तरीत्या दिले जाईल.

राखीव दिवसाचा वापर कधी आणि कसा होणार?
आयसीसी नियमानुसार, जर खेळाच्या दिवशी पाऊस आला, ठरलेल्या षटकांपैकी कमी खेळ झाला आणि सामना शेवटच्या दिवसापर्यंत गेला, पण सामना निकाली लागला नाही, तेव्हा पंच सामना राखीव दिवशी ठेवू शकतात. जर नियमित 5 दिवशीच पराभव, विजय, अनिर्णित किंवा बरोबरीत असा निकाल लागला, तरच सामना राखीव दिवशी खेळला जाणार नाही.

राखीव दिवसाचा वापर तेव्हाच केला जाईल, जेव्हा प्रत्येक दिवशी निश्चित षटकांपेक्षा कमी खेळ होईल. त्यावेळी राखीव दिवशी उरलेल्या षटकांचा वापर केला जाईल. सामन्यात प्रत्येक दिवशी सर्व षटके टाकूनही निकाल निघाला नाही, तर राखीव दिवसाचा वापर केला जाणार नाही.

डब्ल्यूटीसी अंतिम सामना 2021मध्ये झालेला राखीव दिवसाचा वापर
खरं तर, पावसाच्या संकटामुळे आयसीसीकडून स्पर्धेत एक दिवस राखीव ठेवला जातो. 2021मध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर राखीव दिवसाचा वापर करण्यात आला होता. यामुळे सामन्याचा निकाल लागला होता. तसेच, न्यूझीलंड संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. (what will happen in rain spoil match know here reserve day rule in ind vs aus wtc final 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या ताकदीची द्रविडलाही जाणीव; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी म्हणाला, ‘त्याला आऊट करणे…’
भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा स्मिथ WTC फायनलपूर्वी चिंतेत; म्हणाला, ‘होय, मला टेन्शन…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---