क्रिकेटला भारतात धर्म मानले जाते. या खेळाशी कोट्यवधी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. असे असले तरीही क्रिकेट खेळासमोर गेल्या काही महिन्यांपासून मोठे संकट उभे ठाकले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच काही ठप्प पडले आहे. क्रिकेट ही खेळता येत नव्हते. परंतु हळू हळू सर्व काही सुरू होत आहे. अशातच ताण तणाव दूर करण्यासाठी काश्मीरमध्ये विकलांगांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांचे व्हीलचेअरवर क्रिकेट खेळत असतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अनेकांकडून होत आहे कौतुक
काश्मीरमध्ये काही विकलांगांनी मिळून एक गट तयार केला आहे. हा गट क्रिकेट खेळून विकलांग लोकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकांना हा एक चांगला उपक्रम वाटतो, ज्यामुळे समाजाचे भले होऊ शकते.
प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे
क्रिकेट सामना खेळत असलेल्या एका खेळाडूने म्हटले की,” आम्हाला यामुळे खूप प्रोत्साहन मिळते. आम्हाला असे जाणवते की आम्ही इतरांपेक्षा कमी नाहीय आहोत. आमच्यासारख्या आणखी काही लोकांनी पुढे यायला हवं.” तर दुसऱ्या एका खेळाडूने म्हटले की,” इथे आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळते. आम्ही व्हीलचेअर असोसिएशनचे आभार व्यक्त करतो. आम्हाला असे जाणवतच नाही की आम्ही विकलांग आहोत.”
मोठा क्लब बनवण्याची इच्छा
या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्यात वसीम फिरोज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे .वसीम देखील विकलांग आहेत. त्यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. त्यांचे स्वप्न आहे की,प्रत्येक जिल्ह्यातील विकलांग खेळाडूंनी एकत्र येऊन हा खेळ खेळावा.
व्हीलचेअर असोसिएशनचे अध्यक्ष वसीम फिरोज म्हणाले की,” जेव्हा मी हे सुरू केले होते तेव्हा मला वाटले नव्हते की इतका चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांचा उत्साह पाहून मला असं वाटत आहे की, मी आणखी स्पर्धा आयोजित करायला हव्यात. परंतु त्यासाठी योग्य सुविधा मिळत नाहीत.”(Wheel chair cricket tournament in Kashmir for specially abled person to help relieve stress amid corona virus)
शासनाकडून मदतीची अपेक्षा
तसेच वसीम फिरोज पुढे म्हणाले की, “विकलांग लोक नेहमीच तणावात असतात. हा खेळ त्यांचा तणाव कमी करण्यास मदत करेल. व्हीलचेअर क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आम्ही शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिशसह ‘या’ भारतीय भाषांमध्ये होणार WTC Final चे थेट प्रसारण; मराठीचा मात्र समावेश नाही
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा