भारतीय संघात बरेच प्रतिभावान गोलंदाज होऊन गेले. फिरकी आणि जलदगती गोलंदाजांनी संघाला कसोटी क्रिकेटमध्ये बरेच सामने जिंकून दिले आहेत. काही वेळा असं ही झालं आहे, जेव्हा त्यांना विरोधी संघाच्या विकेट्स मिळविण्यासाठी बराच वेळ गोलंदाजी करावी लागली.
असाच एक सामना वेस्ट इंडिजमध्ये झाला होता. जिथे भारताच्या सर्व म्हणजेच ११ खेळाडूंनी गोलंदाजी केली होती. यामध्ये खास गोष्ट ही होती, की भारताच्या पार्टटाइम गोलंदाजांनीही या सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
भारतीय संघ जेव्हा २००२ ला वेस्ट इंडिजला गेला होता, तेव्हा १० ते १४ मे दरम्यान अँटिग्वा येथे झालेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी गोलंदाजी केली होती.
या सामन्यात अजय रात्रा (Ajay Ratra) भारताचा यष्टीरक्षक होता. पण तरीही त्याने एक षटक टाकले होतं. दोन्ही संघांकडून या सामन्यात धावांचा डोंगर उभा केला गेला होता. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. गोलंदाजी करताना सचिनने आणि वसीम जाफरने (Wasim Jaffer) प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
दोन भारतीय खेळाडूंनी ठोकले शतक-
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज शिव सुंदर दास (Shiv Sundar Das) 3 धावा करून बाद झाला. यानंतर राहुल द्रविडने ९१ आणि वसीम जाफरने ८६ धावा केल्या. लक्ष्मणने मैदानावर टिकून फलंदाजी करत १३० धावा केल्या होत्या. तसेच गांगुलीने (Sourav Ganguly) ४५ धावा केल्या. परंतु त्यावेळचा यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्राने जोरदार खेळी करत ११५ धावा केल्या. भारताने ९ बाद ५१३ धावांवर डाव घोषित केला होता.
भारतीय संघाचे आव्हान घेऊन फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची अवस्था सुरुवातीला ४ बाद १९६ धावा अशी होती. त्यानंतर कार्ल हुपरने (Carl Hooper) १३६ आणि शिवनारायण चंद्रपॉलने (Shivnarine Chanderpaul) नाबाद १३६ धावा केल्या होत्या. यष्टीरक्षक फलंदाज रिडले जेकब्स (Ridley Jacobs) याने ११८ धावा केल्या होत्या.
विकेट मिळविण्यासाठी भारतीय संघ खूप षटकं गोलंदाजी करावी लागली. त्यामुळे कर्णधार गांगुलीने सर्व खेळाडूंना गोलंदाजी दिली होती. तेव्हा पार्टटाइम गोलंदाजांना विकेट मिळाल्या होत्या. विंडीजने पहिल्या डावात ९ विकेट गमावून ६२९ धावा केल्या होत्या आणि डाव घोषित केला होता. शेवटी सामना अनिर्णित राहिला होता. अजय रात्राला या सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते.
भारतीय गोलंदाजी तक्ता-
गोलंदाज- जवागल श्रीनाथ, षटके– ४५, धावा- ८२, विकेट्स– ०
गोलंदाज– आशिष नेहरा, षटके– ४९, धावा- १२२, विकेट्स– ०
गोलंदाज– झहीर खान, षटके ४८, धावा- १२९, विकेट्स– २
गोलंदाज– सौरव गांगुली, षटके– १२, धावा- ४४, विकेट्स– ०
गोलंदाज– सचिन तेंडुलकर, षटके– ३४, धावा- १०७, विकेट्स– २
गोलंदाज– अनिल कुंबळे, षटके– १४, धावा- २९, विकेट्स– १
गोलंदाज– व्हीव्हीएस लक्ष्मण, षटके– १७, धावा- ३२, विकेट्स– १
गोलंदाज– राहुल द्रविड, षटके– ९, धावा- १८, विकेट्स– १
गोलंदाज– वसीम जाफर, षटके– ११, धावा- १८, विकेट्स– २
गोलंदाज– शिव सुंदर दास, षटके– ८, धावा- २८, विकेट्स– ०
गोलंदाज– अजय रात्रा, षटके– १, धावा- १, विकेट्स– ०
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुल पहिल्यांदा करणार भारतीय टी२० संघाचे नेतृत्व, पाहा कशी राहिलीय कर्णधाराच्या रूपात कामगिरी
विश्वचषकातील सरासरी प्रदर्शनानंतरही भारतीय क्रिकेटर टॉप-१०मध्ये कायम, स्म्रीती ‘या’ स्थानी कायम
इंस्टाग्रामचा कोहलीच ‘किंग’! विराटने पूर्ण केले खास द्विशतक, बनला जगातील एकमेव क्रिकेटर