भारतीय संघ आशिया चषक 2022 मधील त्यांचा दुसरा व अखेरचा साखळी फेरी सामना हाँगकाँग संघाविरुद्ध (INDvsHK) खेळणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते. यानंतर आता हाँगकाँगलाही पराभवाचे पाणी पाजत भारतीय संघ अ गटातून सुपर-4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ बनण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे हाँगकाँग संघाचा हा आशिया चषकातील पहिलाच सामना असेल. संघाने पात्रता फेरीतील तिन्ही सामने जिंकत मुख्य स्पर्धेत जागा पक्की केली होती.
हा सामना कुठे, किती वाजता होणार आहे?, तसेच हा सामना पाहण्यासाठीची अर्थात लाईव्ह स्ट्रिमिंगबद्दलची (Live Streaming) सविस्तर माहिती जाणून घेऊ…
भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: भारत विरुद्ध हाँगकाँग
तारीख आणि वेळ: बुधवार 31 ऑगस्ट, संध्याकाळी 7.30 वाजता (नाणेफेक 7 वाजता)
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल
भारत आणि हाँगकाँगचे संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर
हाँगकाँग – निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेचनी (यष्टीरक्षक), जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला, अतीक इक्बाल, मोहम्मद वाहीद, वाजिद शाह, आफताब हुसेन, धनंजय राव, अहान त्रिवेदी
भारत आणि हाँगकाँगचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, युझवेंद्र चहल
हाँगकाँग- बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, हारून अर्शेद, एहसान खान, झीशान अली, एसएस मॅकेचनी, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ष १९८० मध्येच प्रणवदांना मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
अल्टिमेट खो-खो: मुंबई खिलाडीज संघाचा विजयाने समारोप