गतवर्षी कोरोना असल्यामुळे सर्व काही ठप्प पडले होते. संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. ज्यामुळे क्रिकेटही थांबले होते. सामान्य नागरिकांसह क्रिकेटपटू देखील घरातच होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मैदानात कोहली..कोहलीचा जल्लोष ऐकण्याची सवय झाली होती. परंतु घरी राहून हे शक्य नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी अनुष्का शर्माने वेगळीच शक्कल लढवली होती.
गतवर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी अनुष्का शर्मा जोर जोरात ओरडून विराट कोहलीला म्हणाली होती की,” ए कोहली चौकार मार ना.चौकार..असा का बसला आहेस…” हे ऐकून विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तिने पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यावर चाहत्यांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
अनुष्का शर्माचा हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी असे ही म्हटले की होते की, जर सर्वच क्रिकेटपटूंच्या पत्नीने असच करायला सुरुवात केली तर, नक्कीच आपण विश्वचषक स्पर्धा जिंकू. हा व्हिडिओ शेअर करत, तिने कॅप्शन म्हणून लिहिले होते की, “मला वाटत होते की, त्याला मैदानावर नसल्याची कमतरता जाणवत असेल. कारण मैदानात त्याला लाखो लोकांचे प्रेम मिळते. विराट या विशेष प्रशंसकाची ही आठवण येत असेल. म्हणून माझा हा छोटा प्रयत्न होता.”
https://www.instagram.com/p/B_EwaTjJL-G/?utm_source=ig_web_copy_link
यावर्षी देखील विराट आणि अनुष्काने, कोरोना लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी एक मोहीम सुरू केली होती. ज्यामध्ये त्याने २ कोटींचे योगदान दिले होते. यासोबतच ७ दिवसात ७ कोटी निधी गोळा करण्याचे आव्हान ठेवले होते. त्यांनी जनतेला या मोहिमेत निधी दान करण्यासाठी आवाहन केले होते. त्यांची ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली होती. त्यांना अवघ्या सात दिवसात तब्बल ११ कोटी गोळा करण्यात यश आले होते. हे अभियान यशस्वीरित्या पार पडल्यानंतर त्यांनी जनतेचे आभार देखील मानले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: कारकिर्दीत अनेक वादळे येऊनही नरीन आपली ‘मिस्ट्री’ टिकवून आहे
सागरिका घाटगेबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल ७ वर्षे होते प्रेमसंबंध