---Advertisement---

कॅप्टनकूल धोनी म्हणतो, ‘मलाही दबाव येतो, मला पण भीती वाटते’

On: शुक्रवार, मे 8, 2020 12:39 PM
---Advertisement---
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मैदानावर नेहमीच शांत असतो. तसेच त्याची भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्येही गणना केली जाते. पण असे असले तरी त्यालाही भीती वाटते तसेच दबाव येतो, असे त्याने स्पष्ट केले आहे.

माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथच्या मेंटल हेल्थवर काम करणारी संस्था MFORE च्या एका चर्चा सत्रात क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेनिस अशा विविध खेळांच्या प्रशिक्षकांशी धोनीने चर्चा केली होती. हा कार्यक्रम कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये धोनीने मानसिक आरोग्याच्या बद्दलही आपली मते मांडली आहेत.

धोनी म्हणाला, ‘माझ्या मते भारतात अजूनही मानसिक आरोग्यामधील कमजोरी स्वीकारणे एक मोठी समस्या आहे. परंतु आपण बर्‍याचदा याला मानसिक आजार म्हणतो.’

मागीलवर्षी जूलैमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा धोनी पुढे म्हणाला, ‘कोणीही म्हणत नाही की जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा पहिल्या ५-१० चेंडूंवर माझे हृदय धडधडत असते. मलाही दबाव येतो, मला थोडी भीती वाटते कारण प्रत्येकाला असे वाटते की – त्याला कसे सामोरे जावे?’

‘ही एक छोटी समस्या आहे परंतु कधीकधी आपण प्रशिक्षकाशी बोलण्यास संकोच करतो आणि म्हणूनच खेळामध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील संबंध खूप महत्त्वाचा असतो.’

भारताचा विश्वविजेता कर्णधार धोनीने संघाबरोबर मेंटल कंडिशनिंग कोच असण्याचे महत्त्व पटवून देताना म्हटले की ‘मेंटल कंडीशनिंग कोच हा १५ दिवसांसाठी येणारा नसावा, कारण जेव्हा आपण १५ दिवस येतो तेव्हा आपण केवळ अनुभव शेअर करत असतो. जर मेंटल कंडीशनिंग कोच नेहमीच संघाबरोबर राहिला तर त्याच्या खेळावर काय परिणाम होत आहे हे त्याला समजू शकेल.’

MFORE चे संस्थापक एस बद्रिनाथ आणि श्रावण कुमार आहेत. स्पोर स्पोर्ट्स १ तमिळ १० मे रोजी ‘माइंड मास्टर्स बाय MFORE’ शोला प्रारंभ करणार आहे, ज्यामध्ये धोनी, कोहली आणि आर अश्विन व्यतिरिक्त इतर खेळाशी संबंधित खेळाडू मेंटल कंडिशनिंग आणि मानसिक कौशल्यांबद्दल आपले मत मांडतील.

ट्रेंडिंग घडामोडी – 

टेनिसपटू सानिया मिर्झाचे आहेत या क्रिकेट कर्णधारांशी कौटुंबिक संबंध

लाडक्या लेकीने बनवलेला खास पदार्थ सचिन तेंडुलकरने केला काही सेंकदातच फस्त!

बॅटप्रमाणे आता चेंडूमध्येही होणार बदल? जेणेकरून गोलंदाजांना…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---