भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. याच सामन्याद्वारे भारतीय प्रेक्षकांना मैदानावर येऊन सामना पाहण्यास परवानगी देण्यात आली. प्रेक्षक मैदानात आल्यानंतर खेळाडूंचा उत्साह वाढलेला दिसला व भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रेक्षकांना भारतीय संघातला आणखी जोशामध्ये पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केले. यासंबंधीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
प्रेक्षकांना मिळाली सामना पाहण्यास येण्याची परवानगी
कोरोना महामारीमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा या बंद दरवाजाआड खेळवल्या जात होत्या. सध्या भारतात भारत विरुद्ध इंग्लंड ही कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या चेन्नई कसोटीत प्रेक्षकांना येण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआयने मैदान क्षमतेच्या ५०% प्रेक्षकांना मैदानात येण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे, प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असलेले दिसून येत आहे.
विराटने वाढवला चाहत्यांचा उत्साह
मैदानात प्रेक्षक आल्याने भारतीय संघाच्या आत्मविश्वासात फरक पडलेला दिसून आला. इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर वर्चस्व गाजवणे सुरू ठेवले आहे. भारतीय गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करत असताना विराट कोहलीने प्रेक्षकांना त्यात सामील करून घेण्यासाठी शिट्ट्या वाजवण्याचा इशारा केला. ज्याला चाहत्यांनी तातडीने प्रतिसाद देत, शिट्टी वाजवणे सुरू केले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून यासंबंधीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आयपीएलमधील एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ व्हीसलपोडू म्हणजेच सुट्टी वाजवून आनंद साजरा करत असतो. चेपॉक स्टेडियम चेन्नई सुपर किंग्सचे गृहमैदान आहे.
When in Chennai, you #WhistlePodu! 👌👌#TeamIndia skipper @imVkohli egging the Chepauk crowd on & they do not disappoint. 👏👏 @Paytm #INDvENG
Follow the match 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/JR6BfvRqtZ
— BCCI (@BCCI) February 14, 2021
भारतीय गोलंदाजांची आक्रमक गोलंदाजी
फलंदाजांनी उभारलेल्या ३२९ भावा नंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवणे सुरू ठेवले आहे. ५५ व्या षटकाच्या अखेरपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ८ बाद ११८ अशी झाली आहे. भारताकडून अनुभवी रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक चार तर पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने २ बळी मिळवले आहेत. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या –
बेन स्टोक्ससाठी ‘हे’ गोलंदाज धोक्याची घंटा, धाडलंय सर्वाधिक वेळा तंबूत; आर अश्विनचाही समावेश
Valentines Day Special : लव्ह अॅट फर्स्ट साईट! शिखर धवनची फिल्मी प्रेमकहाणी
वाह रे अश्विन ! २०१५ पासून गाजवतोय कसोटी क्रिकेट, आकडे पाहून थक्क व्हाल