भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. तसेच मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघाला नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चला तर जाणून घेऊया, ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर कशी राहिली आहे भारतीय संघाची कामगिरी?
ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर आतापर्यंत एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर २ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उर्वरित ३ सामने हे अनिर्णीत राहिले आहेत. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, पहिल्या कसोटी सामन्यात कोणता संघ बाजी मारेल?
ट्रेंट ब्रिजमध्ये भारतीय संघाचा शेवटचा सामना
भारतीय संघाने ट्रेंट ब्रिजमध्ये शेवटचा कसोटी सामना १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०१८ या दरम्यान खेळला होता. विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २०३ धावांनी विजय मिळवला होता.
मालिकेत इंग्लंड संघ होता आघाडीवर
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेतील हा तिसरा कसोटी सामना होता. या मालिकेत इंग्लंड संघ २-० ने आघाडीवर होता. त्यामुळे हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचे होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून केएल राहुल आणि शिखर धवन यांनी ६० धावांची भागीदारी केली होती.
विराट-रहाणेचा जलवा
या सामन्यात चेतेश्वर पुजारा अवघ्या १४ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर विराट कोहलीने ९७ आणि अजिंक्य रहाणेने ८१ धावांची खेळी केली होती. दोघांनी मिळून १५९ धावा जोडल्या होत्या. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला ३२९ धावा करण्यात यश आले होते.
हार्दिक पंड्याची तुफान फटकेबाजी
तुफान फटकेबाजी केल्यानंतर हार्दिक पंड्याने गोलंदाजीमध्येही आपला जोर दाखवला होता. हार्दिक पंड्याने या डावात ५ तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश आले होते. इंग्लंडचा डाव अवघ्या १६१ धावांवर संपुष्टात आला होता.
विराटचे शतक
पहिल्या डावात ९७ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने दुसऱ्या डावात देखील आपला जलवा सुरू ठेवला होता. विराटने दुसऱ्या डावात १९७ चेंडूंमध्ये १०३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर हार्दिक पंड्याने ५२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने ३५२ धावांवर डाव घोषित केला होता. (When Indian team played last test match at Trent bridge? Click here to know the result)
भारतीय संघाचा विजय
इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी ५२१ धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे होते. परंतु भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाजांनी नांग्या टाकल्या. जसप्रीत बुमराहने या डावात सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. इंग्लिश संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ३१७ धावांवर संपुष्टात आला होता. दोन्ही डावात तुफानी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
प्लेइंग इलेव्हनबद्दल वसीम जाफरचा कोहली अन् शास्त्रींना ‘गुप्त संदेश’, पाहा तुम्हाला समजतोय का?
पुजारा इंग्लंडविरुद्ध करणार सलामीला फलंदाजी? उपकर्णधार रहाणेने दिले ‘हे’ उत्तर
‘नेक्स्ट स्टॉप इंग्लंड’! अखेर सूर्यकुमार अन् पृथ्वीने इंग्लंडसाठी भरली उड्डाण, फोटो केले शेअर