क्रिकेट या खेळात गेल्या काही वर्षात अनेक मोठे बदल झाले आहेत. सुरुवातीला पारंपरिक क्रिकेट म्हणून कसोटी क्रिकेटला अधिक महत्व दिले जायचे. परंतु, जसं जशी वेळ पुढे सरकली, तसेच वनडे,टी -२०, टी -१० आणि आता इंग्लंडमध्ये १०० चेंडूंच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तसेच सुरक्षेच्या बाबतीत देखील अनेक बदल झाले आहेत. यापूर्वी क्रिकेटपटू हेल्मेट न घालता दिग्गज आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करायचे. परंतु, आता हेल्मेट घालून खेळणे अनिवार्य झाले आहे. हेल्मेट घालत नसल्यामुळे अनेक वेळेस चेंडू डोक्याला लागण्याची भीती असायची. असा एक किस्सा माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी समालोचन करताना सांगितला आहे.
सुनील गावसकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात १९७१ मध्ये केली होती. त्यांना सर्व जण लाडाने सनी असे म्हणायचे. तसेच त्यांना लिटिल मास्टर या नावाने देखील ओळखले जायचे. अनेक मोठ मोठ्या सामन्यात सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यावेळी मेल्कम मार्शल, एंडी रॉबर्ड्स, माईकल हेल्डींग,डेनिस लिली, इम्रान खान यांसारखे वेगवान गोलंदाज होते. या गोलंदाजांविरुद्ध ते निडर होऊन हेल्मेट न घालता खेळायचे.
मार्शलचा चेंडू सुनील गावसकरांच्या डोक्याला लागला
सुनील गावसकर यांनी मेल्कम मार्शल यांची मैदानातील वैरी सर्वांना माहित असेलच. ही गोष्ट १९८३ ची आहे. ज्यावेळी भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर होता. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सुनील गावसकरांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात, वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात ४७० धावा केल्या आहेत.
या धावांच्या प्रत्युत्तरात सुनील गावसकर यांनी डावाची चांगली सुरुवात करून दिली होती. त्यांच्या खेळीवर पूर्णविराम लावण्यासाठी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी बाऊन्सर आणि शरीराच्या लाईनवर गोलंदाजी करायला सुरुवात केली. त्यादरम्यान मार्शलने एक वेगवान बाऊन्सर चेंडू टाकला,जो सुनील गावसकरांच्या कपळाला जाऊन लागला होता.(When melkam Marshal’s ball hits on Sunil gavaskar forehead)
तू लोखंडाने बनला आहेस…
हेल्मेट न घातल्यामुळे तो चेंडू थेट त्यांच्या कपाळाला जाऊन लागला होता. हा किस्सा सांगत, सुनील गावसकर म्हणाले की, “जर तो चेंडू कानाच्या जवळपास लागला असता, तर तो माझा शेवटचा दिवस असता. मला त्या अवस्थेत पाहून,ड्रेसिंग रूममधील सदस्य हादरले होते. स्लीपमध्ये उभा असलेले दिग्गज खेळाडू विवियन रिचर्ड्स धावत आले आणि मला विचारू लागले त्यावेळी मी त्यांना म्हटले की मी ठीक आहे. त्यावेळी ते मला म्हणाले, यु आर मेड ऑफ स्टील मॅन ( तू लोखंडाने बनला आहेस).”
वेगवान बाऊन्सर नंतर त्यांनी यॉर्कर चेंडू टाकला,ज्यावर सुनील गावसकर यांनी चौकार मारला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटविश्वातील ‘फॅब फोर’ने केव्हा ठोकली होती अखेरची शतके, वाचा सविस्तर
‘मैदानावर आक्रमक असल्याने गांगुलीला मदत मिळायची, विराटचेही असेच काही आहे’, दिग्गजाचे मत
रोहित सुपरहिट! अर्धशतकासह ‘या’ विक्रमाला घातली गवसणी; केली पंतची बरोबरी