Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्लंडच्या दिग्गजाने शून्यावर इनिंग डिक्लेअर करून केलेला करेक्ट कार्यक्रम, एक नजर टाकाच

इंग्लंडच्या दिग्गजाने शून्यावर इनिंग डिक्लेअर करून केलेला करेक्ट कार्यक्रम, एक नजर टाकाच

March 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Mike-Brearley

Photo Courtesy: Twitter/ICC


माईक ब्रेअर्ली. क्रिकेटच्या अस्सल फॅन्सना हे नाव नक्कीच माहीत असेल. बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये ते अनेक दिग्गजांच्या आसपासही जात नाहीत. तरीदेखील त्यांचा गुणगौरव झाल्याशिवाय क्रिकेटचा इतिहास पुढे सांगता येत नाही. एखादा खेळाडू संघात राहण्यासाठी अपार मेहनत करतो आपल्या कौशल्यांना आणखी धार लावतो. पण, माइक ब्रेअर्ली या सर्वात वेगळे होते. त्यांचे एकच काम होते नेतृत्व करणे. फक्त नेतृत्व करण्यासाठी त्यांची संघात जागा असायची. डावपेच, स्ट्रॅटजी, चाणक्यनीति या सर्वांची एकत्रित मोट बांधत त्यांनी नेतृत्व केलेल्या 31 टेस्टपैकी 18 टेस्टमध्ये इंग्लंडने विजय मिळवलेला. पराभव फक्त चार. 1976-77​​च्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये मिडलसेक्सने ब्रेअर्ली यांच्या ‘परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रमामूळे कशी ट्रॉफी जिंकलेली याचा हा किस्सा.

सन 1976-77 काऊंटीच्या रणांगणात मिडलसेक्स विरुद्ध सरे अशी ‘लंडन डर्बी’ रंगणार होती. इंग्लिश समर संपून इंग्लंडमध्ये थोडाफार पावसाळा सुरू झालेला. त्यातच सिझनच्या शेवटच्या काही मॅचेस होणार होत्या. लंडन डर्बीचा पहिला दिवस पावसामुळे पूर्णपणे वाया गेला. दुसर्‍या दिवशी रविवार होता. त्यावेळी, रविवार ‘जॉन प्लेअर लीगसाठी उर्फ संडे लीगसाठी राखीव असायचा. सरेने संडे लीगमध्ये लेसेस्टरशायरविरूद्ध मॅच खेळली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मिडलसेक्सने यॉर्कशायरविरुद्ध संडे लीगमधील आपली मॅच ड्रॉ केली.

मिडलसेक्स- सरे मॅच सोमवारी सुरू करण्याचे ठरले. मात्र, रविवारी रात्रीच्या पावसामुळे खेळ वेळेवर सुरू झालाच नाही. लंचनंतरच दुपारच्या कडक उन्हात मॅच सुरू झाली. यजमान मिडलसेक्सचे कॅप्टन माईक ब्रेअर्ली यांनी टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने अवघ्या 23 मिनिटांच्या खेळ झाला असताना, खराब सूर्यप्रकाश आणि पाऊस पडल्याने खेळ पुन्हा थांबला. सरेने पाच ओवरमध्ये 1 विकेट 8 रन्स केल्या. खेळ झालेली, 23 मिनिटे खूप महत्त्वाची ठरली. काऊंटीच्या नियमांनुसार, तीनदिवसीय मॅचमधील दोन दिवस वाया गेले तर ती मॅच वनडे होते व दोन्ही टीमना प्रत्येकी एक इनिंग मिळते, पण दुसऱ्या दिवशीच्या त्या 23 मिनिटाच्या खेळामुळे अजूनही सामन्यात दोन्ही संघ दोन-दोन इनिंग खेळू शकत होते.

काऊंटीच्या नियमानुसार विजेत्याला 12 पॉईंट्स मिळायचे, पण दोन दिवसांचा खेळ वाया गेल्याने, दोन्ही टीमना दोन-दोन इनिंग मिळतील याबाबत सर्वांना शंका होती. त्याचप्रमाणे, कोणतीही टीम विजयी होण्याची शक्यता खूप कमी होती. ब्रेअर्ली यांना चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स-टेबलमधील आपल्या संघाची स्थिती आणि स्पर्धेच्या नियमांची चांगली माहिती होती. शेवटच्या दिवशीचे वातावरण चांगले होते. परंतु, पीच ग्रीन टॉप आणि काहीशी ओलसर झालेली. वेन डॅनियल आणि माईक सेलवे यांनी एकत्रितपणे आठ विकेट्स घेत 22.5 ओव्हरमध्ये अवघ्या 49 रन्सवर सरेचा डाव गुंडाळला. 50 रनांच्या आत विरोधी संघाला ऑल आऊट केल्याने चार बोनस पॉईंट्स मिडलसेक्सला मिळाले.

मिडिलसेक्सने ओपनर म्हणून स्पिनर जॉन एम्ब्यूरी आणि विकेटकीपर इयान गोल्ड यांना पाठवले. सरेचे कॅप्टन रॉबिन जॅकमॅन यांनी पहिल्याच बॉलवर एम्ब्युरी यांच्याविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील केले. दुसरा बॉल टाकण्याआधीच, मिडलसेक्सचे कॅप्टन माइक ब्रेअर्ली यांनी 0.1 ओव्हर्सनंतर 0-0 रन्सवर आपली इनिंग डिक्लेअर केली. या निर्णयाने सारे आश्चर्यचकित होते. असं कसं होऊ शकतं याचा सारे जण विचार करत राहिले. तिकडे ब्रेअर्ली यांना आपल्या बॉलर्सवर विश्वास होता. बॉलर्स सरेला पुन्हा एकदा लवकरात लवकर ऑल आऊट करतील याची ब्रेअर्ली यांना खात्री होती. डॅनियल आणि सेलवे यांनी कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवत,‌ पुन्हा एकत्रितपणे सात विकेट्स घेतल्या. सरेची इनिंग 89 मध्ये संपली.

यजमानांना विजयासाठी 139 रन्स बनवायच्या होत्या, पण त्यासाठी वेळ खूप कमी शिल्लक होता. त्यांना राहिलेली 27 मिनिट व अधिकच्या 20 ओव्हरमध्ये या रन्स करणे आवश्यक होते. ब्रेअर्ली स्वतः मायकेल स्मिथ यांच्याबरोबर ओपनिंगला आले आणि 27 मिनिटांच्या खेळात सात ओव्हरमध्ये 47 रन्सची भागीदारी केली. मिडिलसेक्सला 20 ओव्हरमध्ये आणखी 92 रन्सची आवश्यकता होती. सरे त्यांचा सर्वात फास्ट आणि अनुभवी बॉलर जेफ्री अर्नोल्डची सेवा घेऊ शकत नव्हता. जेफ्री पायाच्या दुखापतीमुळे ग्राऊंडवर उतरले नव्हते.

स्मिथ 101 रन्सची ओपनिंग देऊन आणि स्वतः 51 रन्स करत आऊट झाले. मॅच संपायला 11 बॉल बाकी असताना, ब्रेअर्ली यांनी नॉट आऊट 66 रन्स करून क्लाईव्ह रॅडली यांच्यासह मॅच संपविली. काऊंटी चॅम्पियनशिपचा डिफेंडिंग चॅम्पियन असलेला, मिडलसेक्स या मॅचच्या सुरूवातीस टॉपवर असलेल्या केंटपेक्षा दोन पॉइंट्सने मागे होता. चॅम्पियनशिपच्या शेवटी दोन्ही टीम्सनी 227 पॉईंट्स अशी बरोबरी साधली. 1976-77 या सिझनचे संयुक्त विजेते केंट व मिडलसेक्स यांना घोषित केले गेले. मात्र, सरेविरुद्ध ब्रेअर्ली यांच्या ‘चाणक्यनीति’ द्वारे मिळवलेले एक्सट्रा पॉईंटच सलग दुसऱ्यांदा मिडलसेक्सला चॅम्पियन बनवून गेले हेही तितकेच खरे!

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ 4 दिग्गज जगात चमकले, पण क्रिकेटच्या पंढरीत ठरले अपयशी; यादीत दोन भारतीयांचा समावेश
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच


Next Post
Photo Courtesy: Instagram

आणि अनुष्का शर्माने मागितली सानिया मिर्झाची माफी! दोन दिवसांपूर्वी झालेल्या...

Sunil-Gavaskar-And-Mahela-Jayawardene

क्रिकेटच्या मैदानावरील 'या' 3 युक्त्या ठरल्या माईलस्टोन, गावसकरांची युक्ती सर्वात भारी

Ravindra-Jadeja-And-Umesh-Yadav-And-MS-Dhoni

एकेकाळी खायचे वांदे असणारे पाच भारतीय, आज आहेत कोट्यवधी रुपयांचे मालक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143