जगभरात सर्वात जास्त चर्चिली जाणारी आयपीएल स्पर्धा तिच्या नियमांसाठी पण ओळखली जाते. बीसीसीआयच्या गव्हर्निंग काऊन्सलिंगच्या नियमानुसार स्पर्धेतील कोणताही संघ त्यांच्या प्लेइंग एलेव्हनमध्ये ४ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू ठेवू शकत नाही. आयपीएलच्या संघात ८ परदेशी खेळाडू जरी ठेवता येत असले तरी, फायनल प्लेइंग एलेव्हनमध्ये फक्त ४ परदेशी खेळाडू ठेवता येतात. पण आयपीएलचा असा पण एक संघ आहे, ज्याने ५ परदेशी खेळाडू त्यांच्या टीममधून खेळवले आहेत.
मुंबई इंडियन्स संघ सर्वात जास्त समतोल संघ म्हणून आयपीएलमध्ये ओळखला जातो. त्या संघाने बऱ्याच सामन्यांमध्ये ५ परदेशी खेळाडू खेळवल्याची उदाहरणे आहेत. आयपीएलप्रमाणेच चँपियन्स लीग नावाची पण क्रिकेटची जागतिक पातळीवर मोठी स्पर्धा भरवली जाते. २०११ साली झालेल्या चँपियन्स लीग स्पर्धेत बऱ्यापैकी परदेशी खेळाडूंचा पण भरणा होता. २०११ साली मुंबई इंडियन्स संघात जवळपास ११ खेळाडू परदेशी होते.
२६ सप्टेंबर २०११ साली मुंबई संघाचा सामना त्रिनिदाद आणि टोबॅगो संघांसोबत झाला. हा सामना खूप रोमांचक झाला होता. यात मुंबई संघाने एका रनने विजय मिळवला होता. यावेळी मुंबई संघाकडून ५ परदेशी खेळाडू खेळले होते. यात ऑस्ट्रेलियाचे अॅडियन बिझार्ड आणि अँड्र्यू सायमंड्स, न्यूझीलंडचे जेम्स फ्रँकलीन, वेस्ट इंडिजचे किरोन पोलार्ड आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा या खेळाडूंचा समावेश होता.
परत झालेल्या सामन्यात पण ५ परदेशी खेळाडूंना खेळवण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी न्यू साऊथ वेल्स आणि मुंबई संघात सामना झाला. तेव्हा पण परदेशी ५ खेळाडूंना खेळवण्यात आले. चँपियन्स लीग हि स्पर्धा बीसीसीआय, क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आली होती. यावेळी मुंबई संघाने ५ परदेशी खेळाडूंना खेळवण्याची खास परवानगी काढली होती.
या स्पर्धेत खेळाडूंना सतत त्रास होत असल्यामुळे मुंबईला ही परवानगी काढावी लागली आणि आयोजकांनी ती मान्यता पण देऊन टाकली. त्या वर्षीची चँपियन्स लीग मुंबई इंडियन्स संघाने जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
अजिंक्य रहाणेच्या आजीचे निधन; ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण