---Advertisement---

उमरानविषयी खोचक प्रतिक्रिया दिल्यानंतर पुन्हा चर्चेत आला शाहीन आफ्रिदी; म्हणाला, ‘एकदा फिट होऊच द्या…’

On: रविवार, जून 5, 2022 11:24 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात वेगवान गोलंदाज उमरान मलिकने ताशी १५७ किमी गतीने चेंडू टाकला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा होऊ लागला. उमरानला भारताचा भविष्यातील महत्वाचा गोलंदाज सांगितले जात आहे. पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज शाहीन आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी उमरानविषयी काहीशी खोचक प्रतिक्रिया दिली होती, ज्यामुळे तो चर्चेत आला होता. अशातच आता शाहीन त्याच्या अजून एका प्रतिक्रियेमुळे चर्चेचा बिषय बनला आहे.

उमरान मलिक (Umran Malik) भारतीय संघाच्या इतिहासातील कदाचित सर्वात वेगवान गोलंदाज बनेल, असे म्हटले जात आहे. मात्र, पाकिस्तान संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज म्हणतोय की, फक्त वेग असून चालत नाही. शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याच्या मते उमरानकडे गती आहे, पण त्याच्याकडे लाईन लेंथ आणि स्विन देखील पाहिजे, जेणेकरून तो फलंदाजांना अडचणीत टाकू शकेल. शाहीनच्या या वक्तव्यानंतर भारतीय चाहत्यांचे मन मात्र दुखावल्याचे पाहायला मिळाले होते.

अशातच आता एका पत्रकार परिषदेत चेंडूच्या गतीविषयी बोलताना शाहीनने एक अनोखे उत्तर दिले आहे. एका पत्रकाराने शाहीनला उमरान मलिक आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या गतीविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर शाहीन काहीसा चिडल्यासारखे वाटले, पण त्याने याचे स्पष्टपणे उत्तर दिले. तो म्हणाला की, “सध्या मी माझ्या फिटनेसवर काम करत आहे. फिटनेस व्यवस्थित झाली की, तुम्ही पाहाल माझी गती वाढलेली असेल.”

दरम्यान, मागच्यावर वर्षी वेस्ट इंडिजचा संघ कोरोना महामारीच्या कारणास्तव पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळू शकला नव्हता. आता यावर्षी ही मालिका खेळली जात आहे. शाहीन आफ्रिदी पाकिस्तान संघाचा सध्याचा सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने आयपीएल २०२२आधी खेळल्या गेलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याचा संघ लाहोर कलंदर्ससाठी अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

दुसरीकडे उमरान मलिक आयपीएल २०२२ हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज ठरणार होता, पण अंतिम सामन्यात लॉकी फर्ग्युसनने ताशी १५७ किमीपेक्षा अधिक गतीने चेंडू टाकला, जो हंगामातील सर्वात वेगवान चेंडू देखील ठरला. असे असले, तरी उमरानला त्याचे प्रदर्शन पाहून निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी दिली आहे. या मालिकेत तो आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

रुटच्या सेंच्युरीवर ‘दादा’ही फिदा, गौरवोद्गार काढत म्हणाला, ‘काय खेळाडू आहे, दबावातही चमकलाय’

फॅब ४मध्ये रुटचा धुमाकूळ, तर विराट खातोय गटांगळ्या, स्मिथ-विलियम्सन आसपासही नाहीत

विक्रमवीर ‘राफाʼ..! दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने पटकावले १४वे विक्रमी विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---