---Advertisement---

गोलंदांजाना जमले नाही, पण एका पिझ्झाबॉयने थांबवला होता संजू सॅमसनचा धूमाकूळ, पहा व्हिडिओ

On: शनिवार, मार्च 30, 2019 5:21 PM
---Advertisement---

हैद्राबाद। शुक्रवारी आयपीएल 2019 मध्ये 8 सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात हैद्राबादने 5 विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी मात्र या सामन्यात राजस्थानकडून संजू सॅमसनने शानदार शतकी खेळी करुन सर्वांची वाहवा मिळवली.

या सामन्यात त्याने 55 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली. या त्याच्या तुफानी खेळीचा झंझावात या सामन्यात कोणत्याही गोलंदाजाला रोखता आला नाही. मात्र काही क्षणासाठी एका पिझ्झाबॉयने त्याला फलंदाजी करण्यापासून थांबवले होते.

झाले असे की 12 व्या षटकात राजस्थान 1 बाद 101 धावा अशा अवस्थेत असताना आणि सॅमसनला 44 धावांवर असताना विजय शंकर चेंडू टाकण्यासाठी धावत आला, पण सॅमसन लगेचच बाजूला झाला. कारण तो फलंदजी करत असलेल्या स्टँडसमोर एक पिझ्झाबॉय जात होता. त्यामुळे त्याचे लक्ष विचलित होत होते.

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या काही वेळाच्या अडथळ्यानंतर मात्र पुन्हाएकदा सॅमसनचा धडाका सुरु झाला. यानंतर त्याने नंतरच्या 28 चेंडूत 58 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानने 20 षटकात 2 बाद 198 धावा केल्या आणि हैद्राबादसमोर 199 धावांचे आव्हान ठेवले.

हे आव्हान हैद्राबादने 19 षटकातच 201 धावा करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. हैद्राबादकडून डेव्हिड वॉर्नरने 39 चेंडूत 69 धावांची आणि जॉनी बेअरस्टोने 28 चेंडूत 45 धावांची खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट म्हणतो, या कारणामुळे मुंबई इंडियन्स आहे लकी…

युवराजच्या षटकारांच्या हॅट्रिकनंतर चहलला आठवला स्टुअर्ट ब्रॉड, पहा काय म्हणाला…

विराटच्या नाराजीनंतरही अंपायरवर कारवाईची शक्यता धूसर, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment