भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. हा विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) देखील मोलाची भूमिका बजावली होती. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड सूर्यकुमार यादवला स्लेज करताना दिसून आला होता. दरम्यान सामना झाल्यानंतर, कायरन पोलार्ड (Kieron Pollard) सामना सुरू असताना काय म्हणत होता याचा खुलासा सूर्यकुमार यादवने केला आहे.
हा सामना सुरू असताना वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड सूर्यकुमार यादवला स्लेज करताना दिसून आला होता. ज्यावेळी सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होता, त्यावेळी कायरन पोलार्ड सूर्यकुमार यादवला काहीतरी बोलताना दिसून आला होता. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
सामना झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने अधिकृत प्रसारकासोबत बोलताना म्हटले की, “फलंदाजी करत असताना पोलार्ड मला म्हणत होता की, मिडविकेट पूर्ण रिकामा आहे. आयपीएल सारखा फ्लीक का नाही करत आहे? मी त्याच्या एकाही गोष्टीकडे लक्ष दिले नाही कारण मला शेवटपर्यंत फलंदाजी करायची होती.” सूर्यकुमार यादव २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघाने त्याला आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कायरन पोलार्डला देखील मुंबई इंडियन्स संघाने आगामी हंगामासाठी रिटेन केले आहे.
भारतीय संघाचा ६ गडी राखून विजय
युझवेंद्र चहलच्या ४ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ३ गडी बाद करण्याच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा डाव १७६ धावांवर संपुष्टात आणला होता. वेस्ट इंडिज संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
प्रो कबड्डी लीगच्या १००व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सची बाजी, गुजरात जायंट्सवर ५ गुणांनी विजय
आपलेच दात आपलेच ओठ! सूर्यकुमारमुळे रिषभ पंत दुर्देवीरित्या धावबाद, जड मनाने परतला तंबूत
पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर दीपक हुडा झाला इमोशनल; म्हणाला, ‘विराट भैय्याकडून कॅप मिळणे…’