बॉलिवूडच्या जगात लिंक-अप आणि नंतर ब्रेकअपच्या बातम्या बर्याच सामान्य झाल्या आहेत. त्याचबरोबर, खेळाडूंच्या आणि सौंदर्यवतींच्या अफेअर्सच्या चर्चा बर्याच दशकांपासून होत आहेत, आणि यापुढेही होत राहतील. भारतीय संघाचे क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये लिंक-अप होत असते, तर कधी- कधी या दोन जगातील लोकांच्या अफेअरच्या बातम्या वर्तमानपत्राच्या मुख्य बातम्या बनतात तसेच कधीकधी त्यांची नाती गुप्तपणे पुढे जातात.
असाच एक प्रसिद्ध अफेअर म्हणजेच भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि आणि सैफ अली खानची (Saif Ali Khan) पहिली पत्नी अमृता सिंग (Amrita Singh) यांचा आहे.
प्रत्येकालाच माहीत आहे, की अमृता नेहमीच बिनदास्त असायची. हाच तो काळ होता, जेव्हा शास्त्री आणि अमृता एकमेकांना डेट करत होते. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, दोघेही आपल्या नात्याबद्दल खूप गंभीर होते आणि त्यांची लग्न करण्याची इच्छाही होती. परंतु त्यांचे संबंध लग्नाच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी माध्यमात आली.
८० च्या दशकात शास्त्रींवर लाखो मुली फिदा होत्या, त्यातीलच एक त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता होती. दोघांनाही बर्याचदा पार्टींमध्ये एकत्र पाहिले जात असे आणि अमृता शास्त्रींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वेळा स्टेडियमवरही पोहचत असे.
याशिवाय एका लोकप्रिय मासिकाच्या कव्हर पेजवरही अमृता आणि शास्त्री एकत्र झळकले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. बातमीनुसार या फोटोंच्या माध्यमातून या दोघांनी आपलं नातं अधिकृत केले होते. त्यावेळी बातम्याही आल्या होत्या, की १९८६ मध्ये शास्त्री आणि अमृता यांचा साखरपुडा झाला होता.
पण साखरपुड्या नंतरही दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला. याचे कारण शास्त्री यांनी आपल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते. शास्त्री म्हणाले होते की, “मला अभिनेत्री पत्नी म्हणून नको होती. कारण मला वाटते की माझ्या पत्नीची पहिली प्राथमिकता हे घर असावं.”
शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर अमृतानेही तिच्या एका मुलाखतीत उत्तर दिले आणि म्हणाली की “यावेळी मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे मी हे नातं पुढे नेऊ शकत नाही. पण मला खात्री आहे, की काही वर्षांनंतर मी एक पूर्ण वेळ पत्नी आणि आई होईल.”
काही वर्षांच्या सिरीयस रिलेशननंतर शास्त्री आणि अमृताचा ब्रेकअप झाला. त्यानंतर शास्त्रीने १९९० मध्ये रितु सिंगशी (Ritu Singh) लग्न केले आणि त्यानंतरच्या वर्षी म्हणजेच १९९१ मध्ये अमृताने बॉलीवूडचा धाकटा नवाब सैफ अली खान याच्याशी आपला संसार थाटला. परंतु लग्नानंतरही डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आणि नंतर निमरत कौर (Nimrat Kaur) यांसारख्या सेलिब्रिटींबरोबर शास्त्री यांचे नाव चर्चेत होते. परंतु त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे कधीच काही सांगितले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक
क्रिकेट इतिहासातील चार अविश्वसनीय विक्रम, ज्यांना मोडणे आहे जवळपास अशक्यच
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कोण जिंकणार? पॅट कमिन्सचा ‘या’ संघाला कौल