---Advertisement---

सचिन आणि वाद: ‘जेव्हा सचिन म्हणाला होता की, मी क्रिकेटपटू नाही तर अभिनेता आहे’, वाचा ते संपूर्ण प्रकरण

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 9:49 AM
---Advertisement---

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याने नुकतेच देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते, ज्यामुळे तो चर्चेत आला. काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा वर उचलल्यानंतर सचिनसह भारतातील अनेक सेलिब्रेटींनी बाहेरच्या लोकांनी भारताच्या अंतर्गत मुद्याबाबत भाष्य करु नये, असे म्हटले होते.

सचिनच्या या ट्विटला खुप प्रतिक्रिया आल्या. यातील अनेक प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. त्याला या ट्विटमुळे चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. याचदरम्यान, सचिनशी जोडलेल्या अनेक गोष्टींची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. यात त्याला २०११ साली मिळालेली करमाफीचीही चर्चा रंगत आहे.

सचिनने केला होता अभिनेता असल्याचा दावा, नक्की काय आहे प्रकरण? 

सन २०१३ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या सचिनने त्याच्या कारकिर्दीदरम्यान अनेक जाहिरातींमध्ये ब्रँड अँबेसिडर म्हणून काम केले आहे. २०११ साली देखील त्याने इएसपीएन, पेप्सीके, व्हिसा अशा काही कंपन्यांच्या जाहिराती केल्या होत्या. ज्यातून त्याला ५,९२,३१,२११ रुपये मिळाले होते. ही रक्कम त्याला परदेशी चलनात मिळाली होती, त्यामुळे जेवढी किंमत मोठी तेवढा करतही त्याला द्यावा लागणार होता. या रकमेवर जवळपास पावणे २ कोटींचा कर लागणार होता.

त्यामुळे सचिनने करमाफी मिळावी म्हणून विनंती केली होती. पण त्यावेळी तो आयकरामध्ये सुट मागण्यासाठी कलाकार, संगीतकार, लेखक, अभिनेता किंवा खेळाडू आहे का आणि त्याला मिळालेली रक्कम कोणत्या व्यावसायातून मिळाली आहे, असे प्रश्न निर्माण झाले होते.

त्यावेळी सचिनने स्वत:ची बाजू आयकर अपील न्यायाधिकरणाकडे मांडताना सांगितले होते की तो अभिनेता असून त्याला करमाफी मिळावी. यावेळी त्याने तो अव्यावसायिक क्रिकेट असल्यचाही दावा करताना तो त्याच्या उत्पन्नाचा इतर स्त्रोत असल्याचे म्हटले होते. याच नियमामुळे साधारण १९९७ पासून त्याला करमाफी मिळत असल्याचेही त्याने सांगितले होते. एवढेच नाही तर सचिनने त्याला सामाजिक कलाकार समजावे असेही त्यावेळी म्हटले होते.

पण या प्रकरणाशी निगडीत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि कार्पोरेट आयकर विभागाकडून सचिनने केलेला अभिनेता असल्याचा दावा फेटाळण्यात आला होता.

मात्र, अखेर आयकर अपील न्यायाधिकरणाने सचिनच्या बाजूने निकाल देताना त्याला करमाफी दिली होती. सचिन क्रिकेटपटू असला तरी जाहिरातींमध्ये त्याला काम करताना अभिनेत्याप्रमाणेच वागावा लागते, असे म्हणत न्यायाधिकरणाने त्याला करमाफी दिली होती.

ज्यावेळी ही करमाफी सचिनला मिळाली होती, त्यावेळीही मोठा गदारोळ झाला होता. सचिनवर मोठ्याप्रमाणात तेव्हा देखील टीका करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्सच्या माजी प्रशिक्षकाचं ऑफिशियल ट्विटर अकाउंट हॅक, सचिनचं ट्विट आपोआपच झालं पोस्ट

नताशाने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवरुन पुन्हा रंगली हार्दिक आणि त्याच्या मुलाची चर्चा

आयपीएल २०२१ : लिलावासाठी तब्बल ११ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी; ‘या’ दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---