भारतीय संघात असे अनेक आजी-माजी खेळाडू आहेत. त्यांंच्याकडून अनेक क्रिकेटपटू आदर्श घेत आहेत. यामध्ये भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश होतो. इतकेच नव्हे तर सचिनला पाहून अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या क्रिकेटपटूंपैकीच हनुमा विहारी एक आहे.
विहारी सचिनला खेळताना पाहूनच मोठा झाला आहे आणि त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. ज्यावेळी विहारी सचिनला (Sachin Tendulkar) बाद होताना पहायचा, तेव्हा त्याला रडायला यायचे (Crying) आणि तो टी.व्ही. बंद करायचा.
यावेळी विहारीने सांगितले की, जेव्हा सचिन बाद व्हायचा, त्यावेळी त्याला खूप वाईट वाटायचे. तसेच रडायलाही येत होते.
सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत जवळपास ३४०००पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जे आजपर्यंत कोणीही तोडले नाहीत.
विहारीचा सर्वात आवडता क्रिकेटपटू (Favourite Cricketer) सचिन आहे. त्याने हे सर्व सोशल मीडियावर चाहत्यांशी बोलताना सांगितले. यादरम्यान विहारीने विराट कोहलीचीही (Virat Kohli) देखील प्रशंसा केली. यावेळी तो म्हणाला की, विराटला धावा करायला खूप आवडते.
विहारी न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचा भाग होता. यावेळी त्याने पहिल्या कसोटी डावात केवळ २१ धावाच केल्या. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ६४ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ लोकप्रिय क्रिकेटर, ज्यांनी वनडेत केले आहे केवळ एक शतक
-१३ एप्रिल २०२०ला होणार जगातील सर्वात मोठा क्रिकेट सामना
-जगातील ३ असे दिग्गज फलंदाज ज्यांना वनडेत करता आले नाही शतक