भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे 2018 साली लग्न झाले आहे. विराट कोहली नुकताच एका मुलीचा पिता देखील झाला आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. सध्या विराटची एक खूप जुनी मुलाखत समोर आली आहे, त्यात तो अनुष्का नव्हे तर जेनेलिया डिसोझाचा चाहता असल्याचे सांगत आहे. या व्हिडिओमध्ये एमटीव्हीची मुलाखतकार अनुषा दांडेकर एका खासगी पार्टीत विराट कोहलीची मुलाखत घेताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये अनुषा विराटला अनेक प्रश्न विचारत आहे, आणि भारताचा कर्णधार त्यांची रोखठोक उत्तरे देत आहे. रॅपिड फायर फेरीत विराटला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला की, जेनेलियाला क्रिकेट खेळताना बघायला आवडेल, या मुलाखतीदरम्यान विराटने सांगितले की तो जेनेलिया डिसोझाचा चाहता आहे. विराटने या जुन्या मुलाखतीत सांगितले होते की जेनेलिया डिसोझा त्याला फार क्यूट वाटते.
जेनेलियाने 2012 साली मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याच्याशी लग्न केले आहे. दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की विराट व जेनेलियाने सोबत एका जाहिरातीत देखील काम केलेले आहे.
दरम्यान, विराट सध्या इंग्लंड दौर्याच्या तयारीत व्यस्त आहे. विराट 24 मे रोजी भारतीय संघाच्या बायोबबलमध्ये सामील होणार आहे. विराट व्यतिरिक्त उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज 24 मे रोजी बायोबबलमध्ये सामील होतील.
बुधवारी मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे चेन्नईहून चार्टर्ड फ्लाइटद्वारे मुंबईला आले आहेत तर पुरुष संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, महिला कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज हैदराबादहून आलेले आहे. बीसीसीआयने दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई येथे पुरुष आणि महिला संघांसाठी तीन चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली होती. भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला पोहोचणार असून तिथे 18 ते 22 जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅराडोना यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हेतर हत्या? जवळच्या लोकांवर संशय