---Advertisement---

टेस्ट सिरीजमध्ये आघाडी घेण्यासाठी भिडणार भारत-इंग्लंड, कधी आणि कुठे होईल चौथी कसोटी; जाणून घ्या सर्वकाही

On: बुधवार, सप्टेंबर 1, 2021 10:41 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता आणि मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. अशाप्रकारे ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना उभय संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

तत्पूर्वी अनेकांना प्रश्न पडला असेल की, चौथा कसोटी कुठे, कधी खेळला जाणार आहे आणि किती वाजता सुरू होईल? चला तर जाणून घेऊया. (When where and how to watch oval test online telecast in india)

कधी होणार चौथा कसोटी सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

कुठे खेळला जाणार चौथा कसोटी सामना? 
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना लंडनच्या केंनिग्टन ओव्हल मैदानावर पार पडणार आहे.

किती वाजता सुरू होणार चौथा कसोटी सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी दुपारी ३ वाजता नाणेफेक होईल.

टिव्हीवर कसा पाहाल हा सामना?
या सामन्याचे टिव्हीवर लाईव्ह प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा थरार हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.

ऑनलाईन कसा पाहाल हा सामना?
या सामन्याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही ऑनलाईन देखील पाहू शकता. हे सामने सोनी लिव्हवर लाईव्ह पाहता येतील. तसेच तुम्ही वेबसाईटवर लाईव्ह स्कोर देखील पाहू शकता.

यातून निवडला जाईल भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा

यातून निवडला जाईल इंग्लंड संघ- 
जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सॅम बिलिंग्स, रोरी बर्न्स, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स, मार्क वुड

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेशच्या अडचणीत वाढ, अव्वल फलंदाजाची ‘या’ कारणामुळे टी२० विश्वचषकातून माघार

‘पोलार्ड अनस्टॉपेबल’! ताबडतोब खेळीसह टी२०त रचला इतिहास, गाठला ‘इतक्या’ हजार धावांचा पल्ला

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यष्टीरक्षक, ज्याच्या साधे २० सामनेही नाहीत आले नशीबी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---