आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. दरम्यान काल (16 फेब्रुवारी) रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. ही स्पर्धा (22 मार्च ते 25 मे) दरम्यान खेळवली जाईल, ज्यामध्ये 10 संघ सहभागी होतील. या सामन्यांसाठी 13 मैदाने निवडण्यात आली आहेत. शुभारंभ सामन्यातच कोलकाता आणि बंगळुरू संघ आमने-सामने असतील. दरम्यान दोन्ही संघातील अटीतटीचा सामना ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
आयपीएल सुरू होण्यास अजून बरेच आठवडे शिल्लक आहेत, पण चाहत्यांचा तिकिटे खरेदी करण्याचा उत्साह आधीच वाढू लागला आहे. आतापर्यंत बीसीसीआयने तिकिट बुकिंग प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही, परंतु मागील हंगामांप्रमाणे, बहुतेक तिकिटे इंटरनेटद्वारे म्हणजेच ऑनलाइन विकली जातील. चाहते संघांच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा पेटीएम, बुक’माय’शो सारख्या प्लॅटफॉर्मवरून तिकिटे खरेदी करू शकतील.
यंदाच्या आयपीएल तिकिटांची विक्री फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला सुरू होऊ शकते. बीसीसीआय यापूर्वीही याच वेळी तिकिटे उपलब्ध करून देत आहे. अनेक संघांनी त्यांच्या सामन्यांसाठी पूर्व-नोंदणी आधीच सुरू केली आहे. उदाहरणार्थ, राजस्थान रॉयल्सचे चाहते (7 ते 20 फेब्रुवारी) दरम्यान नोंदणी करू शकतात, जेणेकरून त्यांना विक्रीसाठी तिकिटे मिळणे सोपे होईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकिटांची किंमत स्टेडियम आणि त्यात असलेल्या स्टँडनुसार ठरवली जाईल. जनरल स्टँडमधील जागांची किंमत 800-1,500 रुपयांच्या दरम्यान असू शकते. असे सांगितले जात आहे. प्रीमियम सीट्सची किंमत 2,000-5,000 रुपयांच्या दरम्यान असेल. व्हीआयपी आणि एक्झिक्युटिव्ह बॉक्समधील एका सीटची किंमत 6,000-20,000 रुपयांच्या दरम्यान असेल. कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला एका सीटसाठी 25,000 ते 50,000 रुपये द्यावे लागू शकतात.
IPL 2025 SCHEDULE. pic.twitter.com/QpEQ7DcE9d
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 16, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सची धुरा कोण सांभाळणार?
भारतीय संघासाठी दुबईत खास खेळपट्टी तयार ! फलंदाजांचा जलवा की गोलंदाजांचा कहर?
आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूचा घटस्फोट, 14 वर्षांच्या नात्याला झाला अंतिम विराम






