आयपीएलला जगातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून ओळखले जाते. अनेक खेळाडू आपले कौशल्य इथे दाखवतात. आयपीएल ही युवा व प्रतिभाशाली खेळाडूंना आपल्यातील प्रतिभा सिद्ध करण्याचे मोठे मंच आहे. अनेक युवा खेळाडू आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करतात आणि भारतीय संघात स्थान मिळवतात. हार्दीक पंड्या, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह असे अनेक खेळाडू आयपीएलमधून भारतीय संघ निवडकर्त्यांच्या नजरेत आले आहेत.
आयपीएलचे दुसरे सत्र २००९ मध्ये दक्षिण अफ्रिकामध्ये खेळवले गेले होते. याच हंगामात आयपीएलला पहिली सुपर ओव्हर मिळाली होती. आयपीएलची पहिली सुपर ओव्हर ही २००९ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळवली गेली होती. या सामन्यातून एक उत्कृष्ट युवा गोलंदाज सर्वांच्या नजरेत आला होता. तो म्हणजे, कामरान खान.
आयपीएलमध्ये पहिली सुपर ओव्हर ही कामरान खानने टाकली होती. २००९ मध्ये या १८ वर्षीय (तेव्हाचे वय) वेगवान गोलंदाज कामरान खानने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्याची कामगिरी पाहून शेन वॉर्नने कामरान खानला भारतीय क्रिकेटचा भविष्य आहे असे म्हटले होते. पण २००९ च्या आयपीएलनंतर कामरान हा क्रिकेटमधून गायबच झाला. आता कामरानने परत आपला सराव सुरु केला आहे व तो भारतीय संघात आगमन करण्याच्या तयारीत आहे.
आयपीएलची पहिली सुपर ओव्हर टाकली होती कामरानने
आयपीएल २००९ मध्ये झालेल्या राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्याच्या शेवटच्या षटकात कोलकाताला ७ धावांची गरज होती व शेवटचे षटक टाकण्यासाठी कामरानला बोलवले गेले होते. कोलकाताकडून सौरव गांगुली व अजित अगरकर फलंदाजी करत होते षटकाच्या ५ व्या चेंडूवर कामरानने सौरव गांगुलीला बाद करत सामना बरोबरीत आणला होता.
पुढे आयपीएल इतिहासातील पहिलीवहिली सुपर ओव्हर कामरानने ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलमविरुद्ध टाकली होती. त्याच्या या षटकात त्याला 15 धावा पडल्या. शेवटच्या चेंडूवर त्याने गेलची विकेटही घेतली होती.
क्रिकेट सरावासाठी मुंबईते आझमगड गाडी चालवत गेलो
लॉकडाऊनदरम्यान मुंबईतील साकीनाका येथील त्याच्या सोसायटीच्या लोकांनी त्याला सराव करण्यापासून रोखले होते. अनलॉक १ मध्ये कामरान आपल्या गावी आझमगड येथे गेला. तिथे गेल्यानंतर तो गावातील काही मुलांबरोबर कठोर सराव करीत आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, “जेव्हा लोक माझ्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये माझ्या गोलंदाजीच्या सरावावर प्रश्न विचारू लागले; तेव्हा मी गावी परतण्याचे ठरवले. मी मुंबईहून गावाला गाडी चालवत आलो.”
मी शेती करतो या बातम्या खोट्या आहेत
आयपीएलमध्ये एक हंगाम खेळल्यानंतर कामरान प्रसिद्धीपासून दूर गेला आणि त्यादरम्यान शेती करून त्याचा उदरनिर्वाह करतोय अशी चर्चा चालू होत्या. परंतु, कामरान याने स्पष्ट केले की या सर्व बातम्या खोट्या आहेत. तो म्हणाला की, “माझ्याविषयीच्या या सर्व बातम्या खोट्या आहेत. मी शेती कधीच केली नाही आणि अधिकवेळा मी मुंबईतील संस्थांसाठी व्यावसायिक क्रिकेट खेळत असायचो.”
कामरानची गोलंदाजीची ऍक्शन संशयास्पद
१४० च्या वेगाने सतत गोलंदाजी करणाऱ्या कामरानची ऍक्शन देखील लसिथ मलिंगासारखी होती. २००९ च्या आयपीएलनंतर त्याची ऍक्शन ही संशयास्पद असल्याचे दिसून आले आणि त्यानेही ही वस्तुस्थिती मान्य केली होती.
कामरानने फक्त ९ आयपीएल सामने खेळले
२००९ मध्ये राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या कामरानने एकूण ९ सामने खेळले होते. दरम्यान त्याने ९ विकेटही घेतल्या होत्या. २०१० पर्यंत राजस्थानकडून खेळत असताना २०११ मध्ये कामरान पुणे वॉरियर्सच्या संघात दाखल झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
जेव्हा सेहवागने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा, २ चेंडूत २१ धावा चोपण्याचा केलता करिश्मा
जेव्हा भारतीय संघाच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी केली होती गोलंदाजी, वाचा त्या सामन्याबद्दल
इंस्टाग्रामचा कोहलीच ‘किंग’! विराटने पूर्ण केले खास द्विशतक, बनला जगातील एकमेव क्रिकेटर