आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या हंगामात अनेक दिग्गज खेळाडू खेळले. काही खेळाडूंनी तुफानी खेळ केला. त्यातील काही आजही खेळताना दिसतात, तर काही निवृत्त झाले. २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघामध्ये एक फलंदाज होता जो त्सुनामीसारखा आला आणि नंतर गायब झाला. त्याने केलेल्या एका वादळी खेळीमुळे तो रातोरात स्टार बनला होता. त्या खेळाडूचे नाव म्हणजे पॉल वॉल्थटी. आज(७ डिसेंबर) त्याचा ३८ वा वाढदिवस आहे. त्याची फलंदाजी म्हणजे आयपीएलमधील एक वादळच होते. हे वादळ आयपीएलच्या एका हंगामात दिसले आणि नंतर ते गायब झाले. परंतु, आता अनेकजण १० वर्षानंतर पॉल वॉल्थटीला विसरुनही गेले असतील.
ती तुफानी खेळी-
१३ एप्रिल २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने (Chennai Super Kings) मोहालीच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर १८९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. एवढे विशाल लक्ष्य पाहुन पंजाबच्या चाहत्यांनी पंजाबकडून विजयाची अपेक्षा सोडली होती. पण अॅडम गिलख्रिस्ट सोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वॉल्थटीने मैदानावर धावांचा पाऊस पाडला. त्याने फक्त ५२ चेंडूत शतक ठोकले. तर केवळ ६३ चेंडूत १२० धावा केल्या. यादरम्यान त्याने १९ चौकार आणि २ षटकार लगावले. स्टॉयरिसपासून, अश्विन आणि मॉर्केलपर्यंतच्या प्रत्येक गोलंदाजावर त्याने जबरदस्त हल्ला बोल केला. आयपीएल २०११ च्या हंगामात वॉल्थटीने १४ सामन्यांत ४६३ धावा केल्या होत्या.
वॉल्थटी आता कुठे आहे?
आयपीएलच्या पुढच्या सत्रात वॉल्थटीने फलंदाजी केली नाही. मनगटाच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचे त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. दुखापतीमुळे तो पहिल्या फॉर्ममध्ये परतू शकला नाही. वॉल्थटी आता एअर इंडियाकडून खेळत आहे आणि एअर इंडियासाठीच काम करतो. वर्ष २०१८ मध्ये तो मुंबई टी-२० स्पर्धेत दिसला, परंतु तो आपला पूर्वीचा खेळ दर्शवू शकला नाही. त्याच्या कौशल्याकडे बघून लोकांना आशा होती की तो भारताकडून खेळू शकेल. पण तसे होऊ शकले नाही.
नशीबचा खेळ –
नशिबाने प्रत्येक वेळी पॉल वॉल्थटीला (Paul Valthaty) साथ दिली नाही. २००१ मध्ये त्याला मुंबई रणजी संघाच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले, पुढच्याच वर्षी त्याला १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. पण विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डोळ्यांना दुखापत झाली होती, त्यानंतर तो फारसे क्रिकेट खेळू शकला नाही, त्यानंतर २०१२ मध्ये मनगटाच्या दुखापतीमुळे तो आयपीएलपासून दूर झाला. तो केवळ २८ व्या वर्षी क्रिकेटमधून बाहेर झाला.
वाचा –
पंजाबच्या ‘या’ शिलेदाराने बलाढ्य चेन्नईविरुद्ध झळकावले होते शतक, तरीही मिळाली नाही टीम इंडियात जागा
एकदाच खेळले पण टिच्चून खेळले! आयपीएल इतिहासातील केवळ एक सामना गाजवणारे भारतीय खेळाडू
HBD जड्डू! बॅटने तलवारबाजी करणाऱ्या ‘सर जडेजा’च्या ३ उत्कृष्ट खेळ्या