---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक WTC विजय; ICCच्या 4 प्रमुख ट्रॉफ्यांवर कोणाचा कब्जा?

---Advertisement---

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आणि WTC मेस ट्रॉफी आपल्याकडे घेतली. तब्बल 27 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिका आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरली. आता पुढील आयसीसी स्पर्धा 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप असणार आहे. अशावेळी सध्या आयसीसीच्या चार प्रमुख ट्रॉफ्या – वनडे वर्ल्ड कप, टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि WTC मेस – कोण कोणत्या देशाकडे आहेत, यावर एक नजर टाकूया.

वनडे वर्ल्ड कप (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने 2023 मध्ये भारताला त्यांच्याच मैदानावर हरवत 6वा वनडे वर्ल्ड कप जिंकला. अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

टी20 वर्ल्ड कप (भारत)
भारताचा आयसीसी ट्रॉफीवरील दुष्काळ 2024 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये संपुष्टात आला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 2007 नंतरचा दुसरा टी20 वर्ल्ड कप जिंकला. ही भारताची 11 वर्षांनंतर मिळालेली कोणतीही आयसीसी ट्रॉफी होती.

चॅम्पियन्स ट्रॉफी (भारत)
टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने 2025 च्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या नावे केली. सलग तिसऱ्यांदा आयसीसी फायनल गाठलेल्या टीम इंडियाने यावेळी न्यूझीलंडला हरवत 2013 नंतर दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मेस (दक्षिण आफ्रिका)
WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पहिल्यांदाच WTC ट्रॉफी आपल्या नावावर केली. एडन मार्करमच्या शानदार शतकाच्या जोरावर त्यांनी 282 धावांचे लक्ष्य पार केले. 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (पूर्वीची नॉकर आऊट स्पर्धा) जिंकल्यानंतर तब्बल 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.

सध्या आयससीच्या ट्रॉफ्यांची स्थिती:
वनडे वर्ल्ड कप – ऑस्ट्रेलिया
टी20 वर्ल्ड कप – भारत
चॅम्पियन्स ट्रॉफी – भारत
WTC मेस – दक्षिण आफ्रिका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---