न्यूजीलंडचा क्रिकेट संघातून महत्वाची बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज आणि कर्णधार केन विलियम्सन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून माघार घेणार आहे. उभय संघांतील ही मालिका तीन सामन्यांची असून विलियम्सन वैयक्तिक कराणास्तव या मालिकेत खेळणार नाहीये. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला विलियम्सन अशा प्रकारे माघार घेत असल्याने संघासाठी ही एक चितेंची बाब ठरू शकते.
सध्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका (NZ vs SA) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 281 धावांनी विजय मिळवला. विलियम्सन या सामन्यातील पहिल्या डावात 118, तर दुसऱ्या डावात 109 धावांची खेळी करू शकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विलियम्सन खेळताना दिसेल. हा सामना हॅमिल्टनच्या सेडॉन पार्कवर 13 फेब्रुवारी पासून सुरू होईल. हा सामना संपल्यानंतर तो पुढचे 10-12 दिवस विलियम्सन कुटुंबासोबत सुट्टीवर असेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार विलियम्सनची पत्नी सारा रहीम () तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. विलियम्सन आणि साराला याआदी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता तिसऱ्यांना वडील बनताना विलियम्सन पत्नी सारासोबत राहू इच्छित आहे. याच कारणास्तव तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत न्यूझीलंड संघाचा भाग नसेल.
Kane Williamson will miss the Australian T20i series as his wife is pregnant.
Many congratulations to Kane Mama and his wife…!!! 👼🏻 pic.twitter.com/daOLosJLFC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 9, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका 21 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 23 आणि 25 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. असे असले तरी, विलियम्सन 29फेब्रुवारी रोजी पुन्हा न्यूझीलंड संघाच्या जर्सीत दिसू शकतो. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात घेतले जाईल. ही मालिका दोन सामन्यांची आहे.
कोण आहे सारा रहीम?
विलियम्सनची पत्नी सारा रहीम मुळची इंग्लंडचीच आहे. 1990 साली ब्रिस्टलमध्ये तिचा जन्म झाला. तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण ब्रिस्टल विश्वविद्यालयात घेतले. साराने वदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरए क नर्स म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिने आपले आयुष्य अगदीच वैयक्तिक ठेवले आहे. @sarah_raheem हे तिचे इंस्टाग्राम अकाउंट देखील प्रायवेट आहे. (While in form, Williamson will withdraw, will not play the series against Australia for pleasure reasons)
महत्वाच्या बातम्या –
Team India । संघातील दुखापतींचे सत्र सुरूच, तिसऱ्या कसोटीआधी महत्वाचा फलंदाज माघार घेणार!
विराटच्या करियरवर उपस्थित होऊ लागले प्रश्नचिन्ह, मागच्या 18 पैकी 14 सामन्यांमधून माघार