भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात वादळी खेळी केली. भारतीय संघाने हा सामना 91 धावांनी जिंकला असून सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला. सूर्यकुमारने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील तिसर टी-20 शतक केले, ज्यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याचाही सामावेश आहे. सूर्याचे कौतुक करताना सलमान बटने स्वतःच्या क्रिकेट बोर्डाची फिरकी घेतली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोटणध्ये खेळला गेला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात 51 चेंडू खेळला आणि यात त्याने नाबाद 112 धावा कुटल्या. उभय संघांतील हा सामना टी-20 मालिकेतील निर्णायक असून भारताने विजय मिळवल्यामुळे मालिका देखील नावावर केली. सूर्यकुमार आज भारताचा महत्वाचा फलंदाज बनला असला, तरी त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी मात्र मोठी प्रतिक्षा करावी लागली. सूर्यकुमारने भारतासाठी टी-20 पदार्पण केले, तेव्हा त्याचे वय 30 पर्षांपेक्षा जास्त होते. सलमान बट (Salman Butt) याच्या मते सूर्यकुमार भारतीय असल्यामुळे वय जास्त असतानाही त्याला देशासाठी पदार्पण करता आले. पाकिस्तनसाठी खेळत असता, तर सूर्यकुमारला वयाच्या 30-31 व्या वर्षी देशासाठी पदार्पणाची संधी मिळाली नसती.
राजकोटमध्ये सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे टी-20 शतक केले असून कर्णधार रोहित शर्मा () नंतर तो या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात जास्त शतके करणारा फलंदाज ठरला. सलमान बटने त्याचे कौतुक करताना स्वतःच्या क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला. सलमान म्हणाला की, “मी अनेक जागी वाटत आहे की, त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तेव्हा त्याचे वजय 30 वर्षांपेक्षा जास्त होते. मी विचार केला की, तो नशीबवान आहे, कारण तो भारतीय आहे. जर तो पाकिस्तानमध्ये जन्मला असता, तर 30 वर्षांच्या वरच्या पॉलिसीच्या शिकार झाला असता.”
दरम्यान, माध्यमांतील काही वृत्तांनुसार असा दावा केला गेला होता, की रमीज राजा पीसीबी अध्यक्ष असताना संघात 30 पेक्षा जास्त वर्षांच्या खेळाडूंना संधी दिली जात नव्हती. या चर्चांमध्ये सलमान बटने हे सुचक विधान केल्याने अशा चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. सूर्यकुमारच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातूप या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. या फॉरमॅटमध्ये सूर्याने आतापर्यंत एकूण 45 सामने खेळले असून 1578 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 46.41 होती, तर स्ट्राईक रेट 180.34 चा होता. (Salman Butt took aim on PCB while praising Suryakumar Yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING: पुण्याचा अभिजीत कटके ठरला हिंदकेसरी 2022 चा मानकरी
सिडनी कसोटीत 195 धावांवर नाबाद परतलेला उस्मान ख्वाजा, द्विशतकाविषयी दिली मोठी प्रतिक्रिया