रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकामुळे साऱ्या क्रीडा विश्वाचे लक्ष तिकडे लागून राहिले आहे.
या विश्वचषकात जरी भारतीय संघ सहभागी झाला नसला तरी भारतीय फुटबॉल चाहत्यांची भारतात कमतरता नाही.
या चाहत्यांमध्ये क्रीडा विश्वातील एक प्रसिद्ध नावही मागे नाही. हे नाव म्हणजे भारताचा धडकेबाडज फलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग.
2018 फिफा विश्वचषकानिमित्त युवराजने एका न्यूज शोमध्ये त्याचा आवडता फुटबॉलपटू आणि त्याचा आवडता संघ तसेच हा विश्वचषक कोण जिंकावे याचा खुलासा केला आहे.
यापूर्वी आपण ऐकले असेलच की मॅचेस्टर युनायटेड हा इंग्लिश फुटबॉल क्लबचा युवराज किती मोठा चाहता आहे.
“या विश्वचषकापूर्वी मी ब्रझील संघाला सपोर्ट करत होतो. पण माझा आवडता फुटबॉलपटू पॉल पोग्बा फ्रान्सकडून खेळत असल्याने मी या विश्वचषकात फ्रान्सला सपोर्ट करतोय.” असे युवराज म्हणाला.
आपण कित्येकदा भारतीय क्रिकेट संघाला सरावावेळी फुटबॉल खेळताना पाहिले आहे. ह्याच मुद्यावर युवराजला टिम इंडीयामधील उत्कृष्ट फुबॉपटू कोण आहे असे विचारण्यात आले होते.
“टीम इंडीयामध्ये धोनी सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे यात काही शंका नाही. पण विराटकडेही चांगले फुटबॉल कौशल्य आहेत. असे असले तरी विराट गोल मात्र करू शकत नाही. रोहीत आणि झहीर असे फुटबॉलपटू आहेत की ते पास देतात आणि जाग्यावरच थांबतात. ते दोघेही खूपच कमी हालचाल करतात.” असे युवराजने सांगितले.
पुढे युवीने गमतीने टिम इंडीयाच्या दोन क्रिकेटपटूंना मात्र इथून पुढे फुटबॉल न खेळण्याचा सल्ला दिला.
“मला वाटते की बुमराह आणि हार्दिकने फुटबॉल खेळने बंद केले पाहीजे. हे दोघेही खूप वाईट पद्धतीने फुटबॉल खेळतात.” असे युवी पुढे म्हणाला.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1009881272603332608
महत्त्वाच्या बातम्या:
–संपूर्ण यादी: पुढील पाच वर्षांचे भारतीय संघाचे वेळापत्रक घोषित