अवनी लेखरा पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकणारी ऍथलीट बनली आहे. तिने महिला स्टँडिंग 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अवनी लेखरा हिने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. पण तिचा ऐतिहासिक प्रवास अजिबात सोपा नव्हता. फार कमी लोकांना माहित असेल की वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ती पॅरालिसीस झाली होती. त्यानंतर तिचे आयुष्य संघर्षमय होते.
अवनी लेखरा हिचा जन्म 8 नोव्हेंबर 2001 रोजी जयपूर राजस्थान येथे झाला. सर्व काही ठीक चालले होते पण 2012 मध्ये अवनीसोबत एक घटना घडली. ज्यामुळे तिच्या आयुष्यात गोंधळ निर्माण झाला. 2012 मध्ये कार अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला पॅरालिसीस झाला होता. अवनीने लहान वयात एवढ्या मोठ्या प्रसंगाला बळी न पडता तिच्या दुखापतीतून प्रोत्साहन घेत यशाकडे वाटचाल केली.
अवनी लेखरा हिने नेमबाजीच्या (SH1) प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. (SH1) श्रेणी म्हणजे ज्या खेळाडूंचे हात नीट हलू शकत नाहीत आणि पाठीचा खालचा भाग नीट हलू शकत नाही. किंवा त्यांच्या पायांच्या हालचालीत समस्या आहेत. 2008 बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्रापासून प्रेरणा घेऊन तिने 2015 मध्ये नेमबाजी निवडली. खरंतर अवनीच्या वडिलांनीच आपल्या मुलीला खेळासाठी प्रोत्साहन दिलं.
अवनी लेखराच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, तिने राजस्थान विद्यापीठातून कायद्याची (LAW) पदवी घेतली आहे. दुसरीकडे, व्यावसायिक नेमबाजीतही तिने कनिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवर जागतिक विक्रम केले आहेत. अवनीला तिच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
हेही वाचा-
“जगातील कोणताच फलंदाज मला…” बुमराहचं मोठं आव्हान! VIDEO
दोन तासांत पदकांचा पाऊस, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला चाैथे पदक
“जो रुटला दोन जन्म घ्यावे लागतील, विराटचा…”, चाहत्यांनी घेतला मायकल वॉनचा क्लास