एशिया कप (Asia Cup)२०२२साठी भारताचा १५ जणांचा संघ जाहीर झाला. यामध्ये रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार असून, भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचे संघपुनरागमन झाले आहे. तर जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. २७ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. यासाठी जो भारतीय संघ निवडला आहे त्यावरून निवड अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. असे असले तरी माजी निवड अधिकारी सबा करीम काही बदल सुचविले आहेत.
भारताने मागील काही सामन्यांमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत बदल केला आहे. तसेच अनेक खेळाडूंना कर्णधारपद दिले आहेत, काहींना सलामीसाठी पाचारण केले आहे. यामुळे पुढील सामन्यांमध्ये कोणता खेळाडू कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार याबाबत जाणुन घ्यायची इच्छा असणारच. हा बदल केल्याने संघ संतुलित राहत नाही, असे मत माजी क्रिकेपटू सबा करीम (Saba Karim) यांनी मांडले आहे. याबरोबरच त्यांनी काही उपायही सांगितले आहेत.
करीम यांनी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक यांच्यातील एकाला निवडावे असे मत मांडले आहे. त्यांनी संघाचे संतुलन राखण्यासाठी या निर्णयाचा आग्रह केला आहे. सद्य स्थितीत पंत हा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये भारताचा पहिल्या क्रमांकाचा यष्टीरक्षक-फलंदाज आहे. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन, कार्तिक आणि संजू सॅमसन यांना संधी मिळते.
करीम यांनी ‘स्पोर्ट्स ओवर द टॉप’ या कार्यक्रमात म्हटले, “भारताला पंत आणि कार्तिक याच्यापैकी एकाला निवडावे लागेल, जेणेकरून अंतिम अकरामध्ये संतुलन राहील आणि चौथ्या क्रमाकांच्या फलंदाजीसाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. या क्रमांकावर कोणाला खेळवावे याबाबत लवकरात लवकर ठरवले पाहिजे. एका विशिष्ट खेळाडूलाच त्या जागेवर फलंदाजी करून द्यावी ज्यामुळे संघ संतुलित राहिल.” करीम यांनी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव याचेही नाव सुचविले आहे.
“या तीन खेळांडूविषयी योग्य तो निर्णय घेतला, तर सूर्यकुमारला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात काही हरकत नाही. मात्र हे सगळे संघावर अवलंबून आहे, की त्याला कधी फलंदाजीसाठी पाठवावे. माझ्या मते, त्याच्यासाठी ४ क्रमांक बरोबर आहे,” असेही करीम यांनी म्हटले आहे.
करीम यांनी एशिया कपच्या स्पर्धेसाठी गोलंदाजीची लाईन-अप कशी असावी याबद्दलही मत मांडले आहे. त्यांनी म्हटले, “भारताने सहा गोलंदांजाच्या पर्यायाने चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये बदल करताना तुम्ही कार्तिकला ७व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा विचार करत असाल, तर हार्दिक पांड्या हा भारताचा पाचवा गोलंदाज ठरेल. त्याची ४ षटकेही महत्वाची आहेत.”
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रोहित अन् विराटपेक्षा सध्या भारताला हार्दिकची जास्त गरज आहे!’ माजी दिग्गजाचे विचित्र विधान
कर्णधार म्हणून राहुलपेक्षा वरचढ धवन! आकडेवारीत गाठलयं ‘शिखर’
‘शोएब मलिक पुन्हा आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणार नाही!’ बाबर आझमने स्पष्टचं सांगितलं