भारतीय क्रिकेटमध्ये टॅलेंटची कमतरता नाही, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. टीम इंडियाकडे एकापेक्षा एक सुपरस्टार खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना नुकतेच भारताच्या पुढच्या सुपरस्टारबद्दल विचारलं. त्यावेळी बहुतेक खेळाडूंच्या ओठांवर एकच नाव होतं, ते म्हणजे यशस्वी जयस्वाल. याशिवाय काही खेळाडूंनी शुबमन गिलचं देखील पुढचा सुपरस्टार म्हणून नाव घेतलं. हे दोन्ही खेळाडू सध्या भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये धुमाकूळ घालत आहेत.
‘स्टार स्पोर्ट्स’वर भारताचा पुढचा सुपरस्टार निवडताना स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी यशस्वी जयस्वालचं नाव घेतलं. तर ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरून ग्रीन यांनी शुबमन गिलची निवड केली. मार्नस लाबुशेन हा एकमेव खेळाडू होता, ज्यानं या दोघांचंही भारताचे पुढचे सुपरस्टार म्हणून वर्णन केलं.
कोणत्या खेळाडूनं कोणाची नावं घेतली?
स्टीव्ह स्मिथ – यशस्वी जयस्वाल
मार्नस लाबुशेन – यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल
मिचेल स्टार्क – यशस्वी जयस्वाल
ॲलेक्स कॅरी – यशस्वी जयस्वाल
जोश हेझलवूड – यशस्वी जयस्वाल
नॅथन लायन – यशस्वी जयस्वाल
ट्रॅव्हिस हेड – शुबमन गिल
कॅमरून ग्रीन – शुबमन गिल
Australian players picking the future Superstars of Indian Cricket. 🇮🇳
– Gill 🤝 Jaiswal…!!!!! pic.twitter.com/RSOzYQOA2k
— Johns. (@CricCrazyJohns) September 16, 2024
टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र सर्वांच्या नजरा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर खिळल्या आहेत. बांगलादेशपाठोपाठ भारताला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. या 10 कसोटी सामन्यांचे निकाल ठरवतील की भारत सलग तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये प्रवेश करणार की नाही.
हेही वाचा –
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक; कधी आणि कुठे होणार सामने? सर्वकाही जाणून घ्या
पाकिस्तानात विराट कोहलीची जबरदस्त क्रेझ! खास फोटो झाला व्हायरल
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 19 शतकं, मात्र अजूनही टीम इंडियात स्थान नाही; या फलंदाजानं मधल्या फळीसाठी ठोकला दावा