मुंबई। आज आयपीएलच्या 12 व्या मोसमात तिसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सुरु आहे. या सामन्यात मुंबईने रसीक सलाम या युवा क्रिकेटपटूला 11 जणांच्या संघात संधी दिली आहे. त्यामुळे त्याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
रसीक हा जम्मू-काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असून तो आयपीएलमध्ये निवड झालेला तिसरा जम्मू काश्मिरमधील खेळाडू आहे. यापूर्वी परवेझ रसुल पुणे वॉरियर्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. तसेच मागीलवर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने मंजूर दरला संघात घेतले होते. मात्र त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता.
श्रीनगर येथील शाय-ए-कश्मीर स्टेडीयमवर झालेल्या टॅलेंट हंट कॅम्पमध्ये भारताचा अष्टपैलू इरफान पठाणने 17 वर्षीय रसीकची निव़ड केली होती. त्यावेळी तो प्रकाश झोतात आला होता. इरफान हा 2018-19 या मोसमात जम्मू आणि काश्मिर संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून खेळला आहे.
उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज असलेल्या रसीकचे वडील हे एका शाळेत शिक्षक आहेत. रसीकने विजय हजारे ट्रॉफीमधून मागीलवर्षी जम्मू आणि कश्मिरच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले आहे. त्याने या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. यात त्याने बाबा अपराजित, नारायण जगदिसन आणि महिपल लोमरोर या तीघांच्या विकेट्स घेतल्या होत्या.
याबरोबरच त्याने यावर्षी रणजी ट्रॉफीमधूनही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने झारखंड आणि आसाम विरुद्ध प्रथम श्रेणीचे सामने खेळले. या दोन सामन्यात मिळून त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर तो नुकत्याच पार पडलेल्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्येही खेळला असून त्याने 5 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या.
त्याला मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएल लिलावाआधी ट्रायल्ससाठी बोलावले होते. रसीकची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील तमिळनाडू विरुद्धची कामगिरी पाहून प्रभावित झाल्याने मुंबईने त्याला ट्रायल्ससाठी बोलावले होते.
त्यानंतर मुंबईने जयपूर येथे झालेल्या आयपीएल लिलावात रसीकला त्याच्या 20 लाख या मुळ किंमतीत संघात सामील करुन घेतले आणि आज त्याने आयपीएलमध्ये पदार्पणही केले. त्याला भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहिर खानने कॅप दिली.
Meet Rasikh Salam – the youngest player from Jammu and Kashmir to make his debut in the @IPL ????
Go boy, make us proud!#CricketMeriJaan #MumbaiIndians #OneFamily #MIvDC pic.twitter.com/1GrKyBFg4w
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल २०१९: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध असा आहे मुंबई इंडियन्सचा ११ जणांचा संघ
–आयपीएलआधी सौरव गांगुलीचा युवराज सिंगला खास सल्ला, पहा व्हिडिओ
–१ वर्षानंतर वॉर्नरचे शानदार पुनरागमन, पहिल्याच सामन्यात केले ३ मोठे पराक्रम





