---Advertisement---

श्रेयस अय्यरचा जीव वाचवणारे टीम इंडियाचे डॉक्टर रिजवान खान कोण? जाणून घ्या सविस्तर

On: मंगळवार, ऑक्टोबर 28, 2025 5:57 PM
---Advertisement---

सिडनी वनडे सामन्यादरम्यान अ‍ॅलेक्स कॅरीचा (Alex carry) झेल घेताना टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer) दुखापतग्रस्त झाला. त्याच क्षणी टीमचे डॉक्टर रिजवान खान (Rijwan Khan) लगेच मैदानात धावून आले आणि त्यांनी अय्यरला प्राथमिक उपचार दिले.

त्यानंतरपासून डॉक्टर रिजवान अय्यरसोबतच राहून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहेत. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, डॉक्टर रिजवान खान यांच्या तात्काळ निर्णयक्षमता आणि दक्षतेमुळेच श्रेयस अय्यरची स्थिती गंभीर झाली नाही. सध्या अय्यरची तब्येत सुधारत असून तो आयसीयूमधून बाहेर आला आहे.

डॉक्टर रिजवान खान हे बीसीसीआयच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वैद्यकीय टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे प्रमुख काम म्हणजे खेळाडूंना दुखापत व आजारांपासून सुरक्षित ठेवणे. स्पोर्ट्स मेडिसिन फिजिशियन असल्याने ते जवळपास प्रत्येक दौऱ्यावर टीमसोबत असतात.

त्याचबरोबर डॉक्टर रिजवान हे खेळाडूंच्या वर्कलोडचं नियोजन, त्यांचा आहार, औषधे आणि फिटनेस याची जबाबदारीही सांभाळतात. श्रेयस अय्यरच्या सध्याच्या दुखापतीच्या काळातही त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन उपचार केले, ज्यामुळे अय्यरची तब्येत आता खूप सुधारली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---