---Advertisement---

सारा तेंडुलकरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा वनराज झवेरी आहे तरी कोण? घ्या जाणून

---Advertisement---

भारतात सेलिब्रेटींच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. याला दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील अपवाद नाही. ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुवकरची मुलगी सारा तेंडुलकर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विविध कारणाने चर्चेत येत आहे. यासाठी बऱ्याचदा तिचे सोशल मीडियावरील पोस्ट कारणीभूत ठरत आहेत. नुकताच तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

साराने रविवारी (२८ नोव्हेंबर) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ती एका व्यक्तीबरोबर गप्पा-गोष्टी करताना दिसत आहे. ही व्यक्ती पाठमोरी उभी आहे. या स्टोरीमध्ये साराने वनराज झवेरी नावाच्या व्यक्तीला टॅग केले आहे. त्यामुळे असा कयास लावला जात आहे की व्हिडिओमध्ये असलेला व्यक्ती वनराज झवेरी आहे. याबरोबरच या व्यक्तीशी तिचे नक्की काय संबंध आहेत? याबद्दलही चर्चांना उधाण आले आहे.

कोण आहे वनराज झवेरी?
खरंतर वनराज झवेरी हा एक प्रसिद्ध ज्वेलर आहे. तसेच भारतात त्रिभोवनदास भीमजी झवेरी प्रा.लि. ही ज्वेलरी रिटेल चेन चालवणाऱ्या झवेरी कुटुंबाचा भाग आहे. त्याचे २०१६ साली रेस्टॉरंट मालक किशोर बजाज यांची मुलगी क्रेशा बजाज हिच्याशी लग्न झालेले आहे. तसेच माध्यमांतील वृत्तानुसार क्रेशा एक फॅशन डिझायनर असून हे दोघेही दाम्पत्य साराचे चांगले मित्र आहेत.

सध्या सारा शिक्षणासाठी लंडनमध्ये आहे. त्याचबरोबर वनराज आणि क्रेशा हे देखील लंडनमध्ये असल्याने त्यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडिओ साराने पोस्ट केला असावा, याची शक्यता आहे.

Photo Courtesy: Instagram/@saratendulkar

शुबमन गिलबरोबर जोडले गेले होते नाव 
साराचे नाव यापूर्वी भारतीय युवा क्रिकेटपटू शुबमन गिलबरोबर जोडले गेले होते. या दोघांनी एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकदा कमेंट केलेल्या असल्याने आणि ते दोघेही एकमेकांच्या नातेवाईकांना फॉलो करत असल्याने त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, काहीदिवसांपूर्वी शुबमन गिलने तो सिंगल असल्याचे स्पष्ट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज

कानपूर कसोटीत भारत की न्यूझीलंड, कोण मारणार बाजी? दिग्गजाने केली भविष्यवाणी

कानपूर कसोटीत अखेरच्या दिवशी श्रीकर भरत करणार साहाऐवजी यष्टीरक्षण, बीसीसीआयने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---