---Advertisement---

कोण आहे वसीम खान? ज्यांच्या प्रयत्नांमुळे पार पडला पीसीबी विरुद्ध यूएई सामना!

On: गुरूवार, सप्टेंबर 18, 2025 6:31 PM
---Advertisement---

आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानने प्रवेश केला आहे. यूएईविरुद्धच्या सामन्यात त्यांचा खेळ जबरदस्त ठरला आणि 41 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीलाच हाई-व्होल्टेज ड्रामा रंगला. पाकिस्तान संघ यूएईविरुद्ध खेळायला तयारच नव्हता. यूएईचा संघ मैदानात पोहोचला होता, पण पाकिस्तानचे खेळाडू हॉटेलच्या बाहेरही पडले नव्हते. पीसीबी आणि आयसीसी यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अखेर पाकिस्तानने सामना खेळण्यास मान्यता दिली.

या संपूर्ण प्रकरणात आयसीसीमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या वसीम खान यांची भूमिका सर्वात निर्णायक ठरली. यूएईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी पीसीबीला तयार करण्यात वसीम यांचा मोठा वाटा होता. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी पीसीबी आणि सामना रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यात संवाद घडवून आणला. वसीम यांच्या जाणतेपणामुळे पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामना अखेर तासाभराच्या उशिराने का होईना, पण खेळला गेला. सुपर-4 फेरीत आता पाकिस्तानचा सामना रविवारी टीम इंडियाशी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---