टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत बांग्लादेशने नेदरलँडचा पराभव केला. नेदरलँड्सला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांग्लादेशकडून शाकिब अल हसनने शानदार फलंदाजी केली. शाकिब अल हसनने 46 चेंडूत 64 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार मारले. या चमकदार कामगिरीसाठी बांग्लादेशी अष्टपैलू खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर शाकिब अल हसनने भारताचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवागला डिवचले आहे.
भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने अलीकडेच शकीब अल हसनवर खडसून टीका केली होती. सेहवाग म्हणाला होता की, शकीब अल हसनने आता क्रिकेट मधून निवृत्ती घ्यावी. पण ह्या गोष्टीवर शाकिब अल हसनला नाराज झाला. नेदरलँड्सविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर त्याने वीरेंद्र सेहवागवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वीरेंद्र सेहवागबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याच्या उत्तरात शकिब अल हसन म्हणला, कोण वीरेंद्र सेहवाग?
Question to Shakib Al Hasan : Virender Sehwag has criticised you alot based on your previous performance.
Shakib : Who ? ????pic.twitter.com/G4grSPrwTB
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) June 14, 2024
याशिवाय शाकिब अल हसन म्हणला आहे की, मी माझा सामनावीराचा पुरस्कार वीरेंद्र सेहवागला समर्पित करतो, जेणेकरून तो क्रिकेटवर भाषण करण्याचा निरोप घेऊ शकेल. शाकिब अल हसनचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स शाकिब अल हसनला सतत ट्रोल करत आहेत. वीरेंद्र सेहवागसोबत शाकिब अल हसन सतत ट्रेंड करत आहे. बांग्लादेशने नेदरलँडचा 25 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नेदरलँड्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तर देताना नेदरलँड्सला 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 134 धावा करता आल्या.
महत्तवाच्या बातम्या-
भारतीय संघास धक्का! सुपर-8 फेरी पूर्वी टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू मायदेशी परतणार
पापुआ न्यू गिनीविरुद्ध अफगाणिस्तानचा शानदार विजय, सुपर-8 मध्ये मिळाला प्रवेश!
पाकिस्तान किंवा श्रीलंका नसून, ‘हा’ आहे आशियातील सर्वोतम दुसरा संघ, नाव ऐकून तूम्ही पण व्हाल अचंबित!






