टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर भारताच्या संघात अनेक बदल होतील अशा चर्चा सुरू झाल्या. त्याची सुरूवात न्यूझीलंड दौऱ्याने झाली. कारण या दौऱ्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्रांती दिली आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 18 नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे. त्याआधी भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
विराट कोहली(Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत कोण घेणार त्यांची जागा, विशेषकरून सलामीवीर फलंदाज म्हणून कोण असणार? कारण संघात इशान किशन याच्याबरोबर शुबमन गिल हाही आहे. गिलला पहिल्यांदाच भारताच्या टी20 संघात निवडले आहे. अशात तो सलामीला फलंदाजी करणार की रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन किंवा दीपक हुड्डा येणार, कारण यांमधील काहींनी टी20 मध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. यामुळे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण कोणाला संधी देतील हे पाहण्याजोगे असेल.
टी20 विश्वचषकात पाहिले की भारताची सलामीजोडी कमकूवत ठरली. एकही सामन्यात रोहित वा राहुलने स्फोटक सुरूवात केली नाही. तसेच पुढील टी20 विश्वचषकासाठी दोन वर्षाचा कालावधी आहे. त्यासाठी भारताला एक उत्तम सलामी जोडी बनवावी लागणार आहे. सध्या संघात पाहिले जर सूर्यकुमार व्यतिरिक्त असा एकही फलंदाज नाही जो धडाकेबाज सुरूवात करून देईल.
किशन, पंत आणि गिल ऑफ स्टम्पच्या चेंडूवर कित्येकदा विकेट देऊन बसले आहेत. किशनला वेगवान गोलंदाजीविरुद्धही अडखळताना पाहिले आहे. अशात लक्ष्मण-पंड्या जोडीला सलामीचा फलंदाज निवडताना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत संजू आणि हुड्डा यांच्या भुमिका स्पष्ट नाही, यामुळे यांनाही ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. Who will bat in Rohit Sharma & KL Rahul Position? india tour of new zealand ind v nz
न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा टी20 संघ- शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाफ डू प्लेसिसचा डेविड वॉर्नरबाबत मोठा खुलासा; म्हणाला, ‘तो दादागिरी करणारा होता आणि गुंडगिरीसाठी..’
डोळ्यांवर काळा चश्मा अन् टीमची जर्सी घालत हार्दिक-केनची ‘क्रोकोडाईल बाइक राइड’; VIDEO व्हायरल