भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करतो. तो सध्या ४० वर्षाचा आहे, अशात आयपीएलचा चालू हंगाम त्याच्यासाठी शेवटचा हंगाम ठरू शकतो किंवा पुढच्या वर्षी धोनी आयपीएमधूनही निवृत्ती घेईल असा अंदाज बांधला जात आहे. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा ऐकून सीएसकेच्या चाहत्यां वाईट तर वाटतच असणार, पण त्यांच्यासमोर धोनीनंतर संघाचा कर्णधार कोण ? असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहत आहे.
धोनीच्या कर्णधारपदाच्या काळात चेन्नई सुपर किंग्स संघ तीन वेळा आयपीएलची ट्राॅफी जिंकला आहे. असे असले तरी, आता धोनीचे वाढते वय लक्षात घेता, संघाचे नेतृत्व दुसऱ्या एखाद्या चांगल्या खेळाडूच्या हातात दिले गेले पाहिजे, जो धोनीप्रमाणेच सीएसके संघासाठी चांगली कामगिरी करू शकेल. या लेखात आपण सीएसके संघातील चार खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे भविष्यात धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर संघाचे नतृत्व सांभाळू शकतात.
१. सुरेश रैना
सुरेश रैना ‘मिस्टर आयपीएल’ या नावाने ओळखला जातो. त्याला नेहमीच धोनीचा उत्तराधिकारी म्हटले गेले आहे. धोनी आणि रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एकाच दिवशी निवृत्ती घेतली होती. अशात धोनीने आयपीएमधून निवृत्ती घेतली तर तो कर्णधारपदासाठी महत्वाचा दावेदार असेल. तो सध्या ३४ वर्षाचा आहे आणि जर त्याला संघाचा कर्णधार केले तर तो किमान पुढचे तीन वर्षतरी संघाचे नेतृत्व करू शकतो.
२ ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाडने २०२० साली चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो सध्या चेन्नई संघासाठी एक विश्वासू खेळाडू बनला आहे. जर चेन्नई सुपर किंग्जला दिर्घ काळापर्यंत नेतृत्व करणारा कर्णधार हवा असेल, तर २४ वर्षाचा ऋतुराज हा एक चांगला पर्यांय संघाकडे उपलब्ध आहे.
३. शार्दुल ठाकुर
शार्दुल ठाकुरलाही २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघात सामील केले गेले होते. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि आत्मविश्वासाचीही कमतरता नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर शार्दुलकडे चेन्नईचा भविष्यातील कर्णधार होण्यासाठी योग्यता आहेत
४. रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजा धोनीच्या आयपीएमधील निवृत्तीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे. तो धोनीचा विश्वासू आहे आणि सध्या त्याच्या क्रिकेटमधील जबरदस्त फाॅर्ममध्ये आहे. भविष्यात तो सीएसकेचा कर्णधार होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबी ९२ धावांवर ऑलआऊट होताच दीपिका पदुकोणचे ११ वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट आले चर्चेत
पराभवानंतरही भारतीय महिलांना क्रमवारीत लाभ; मितालीने पुन्हा काबीज केले अव्वलस्थान
याला म्हणतात जिगर!! बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असतानाही न्यूझीलंड संघ उतरणार मैदानात






