आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून शुभारंभ होणार आहे. दरम्यान पहिलाच सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात रंगणार आहे. पण (23 फेब्रुवारी) रोजी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची सर्वच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली असेल.
या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघातील अटीतटीची लढत दुबईमध्ये पाहायला मिळणार आहे. भारत-पाकिस्तान सामना नेहमीच उत्साहाने भरलेला असतो. पण या सामन्याच्या तिकिटांच्या किमती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु रिपोर्टनुसार, हा सामना दुबईमध्ये होत असूनही, भारत-पाकिस्तान सामना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) भरघोस नफा देणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पाकिस्तान असल्याने, दुबईमध्ये होणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्यांचा फायदा कोणाला होईल असा प्रश्न उपस्थित होतो? एका रिपोर्टनुसार, दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यांमधून मिळणारे सर्व उत्पन्न आणि मैदानातील अन्न आणि पेय पदार्थांच्या व्यवस्थेतून मिळणारे उत्पन्न त्यात जावे अशी चर्चा पीसीबीमध्ये सुरू आहे.
दुबईतील एका प्रसिद्ध मीडिया संस्थेचा हवाला देत एका सूत्राने सांगितले की, “दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यांबाबत अमिराती क्रिकेट बोर्ड, आयसीसी आणि पीसीबी अधिकाऱ्यांशी नक्कीच चर्चा करेल. यामध्ये तिकिटांच्या किमती आणि इतर व्यवस्थांबाबत निर्णय घेता येतील.”
अलिकडेच एक यादी लीक झाली होती, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांच्या तिकिटांच्या किमती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यात, सर्वात कमी तिकिटाची किंमत पाकिस्तानी चलनात 1 हजार रुपये आणि सर्वात महाग तिकिट 25,000 पाकिस्तानी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ-रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर
अधिक वाचा-
आयपीएल 2025पूर्वी केकेआरचे वाढले टेन्शन, सर्वात महागड्या खेळाडूला झाली दुखापत!
रवींद्र जडेजाचा रणजी स्पर्धेत धुमाकूळ, पंजा उघडत रिषभ पंतच्या संघाचं कंबरडा मोडला
कर्णधारपदात उत्तीर्ण, पण फलंदाजीत आलेख घसरला, नेतृत्व स्वीकारल्यापासून सूर्याच्या कामगिरीत घट