भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघामध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मलिका भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची मलिका असणार आहे. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील ही पहिलीच मालिका असणार आहे. परंतु ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज मयंक अगरवाल याला सराव करत असताना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारताकडून डावाची सुरुवात कोण करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच उपकर्णधार अजिंक्य रहाणेने याबाबत खुलासा केला आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. या दरम्यान मोहम्मद सिराजने टाकलेला एक बाऊन्सर चेंडू मयंक अगरवालच्या डोक्याला लागला, ज्यामुळे तो गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती देत म्हटले की, दुखापत गंभीर असल्यामुळे मयंक अगरवाल पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. यापूर्वी सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे मयंक अगरवाल हा सलामीसाठी एक उत्तम पर्याय होता. (Who will open with rohit sharma yet to decide says Ajinkya Rahane)
मयंकनंतर भारतीय संघाकडे सलामीसाठी २ पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे, केएल राहुल आणि दुसरा राखीव खेळाडू अभिमन्यू ईश्वरन. राहुलला मधल्या फळीत खेळवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ईश्वरनबरोबर सलामीसाठी पुजाराचे नाव पुढे येत आहे. याबाबत अजिंक्य रहाणेने योग्य ती माहिती दिली आहे.
NEWS 🚨- Mayank Agarwal ruled out of first Test due to concussion.
The 30-year-old is stable and will remain under close medical observation.
More details here – https://t.co/6B5ESUusRO #ENGvIND pic.twitter.com/UgOeHt2VQQ
— BCCI (@BCCI) August 2, 2021
पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय उप कर्णधार अजिंक्य रहाणेने मीडियासोबत बोलताना म्हटले की, “मयंक पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाल्यानंतर पहिल्या सामन्यात सलामीला कोण उतरणार? याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. टीम कॉम्बिनेशनचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार आहे. पुजारा भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि तो त्याच क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याला सलामीला पाठवले जाणार नाही. पहिल्या सामन्यात सलामीवीर कोण असतील याबाबत कर्णधार आणि प्रशिक्षक मिळून लवकरच निर्णय घेतील.”
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धीमान साहा, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव
राखीव खेळाडू : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अरजन नगवासवाला
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेक्स्ट स्टॉप इंग्लंड’! अखेर सूर्यकुमार अन् पृथ्वीने इंग्लंडसाठी भरली उड्डाण, फोटो केले शेअर
धोनीने ६ वर्षांपूर्वी ‘तो’ सल्ला दिला, म्हणूनच मी चांगला फलंदाज बनलो; जडेजाचा मोठा उलगडा
जसप्रीत बुमराहचा अनोखा सराव, चक्क बॅटिंग पॅड घालून केली गोलंदाजी; प्रतिक्रियांचा आला पूर