यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. हा सामना रवीवारी म्हणजेच 09 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अपाराजित आहे. सेमीफायनलमध्ये संघाने कांगारुंना धुळ चारली. तर दुसरीकडे न्यूझीलंडने मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली 25 वर्षांनंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. किवा संघाने सेमीफायनलमध्ये आफ्रिकेचा पराभव केला. आता आशाप्रकारे दोन्ही संघ फायनलमध्ये भिडण्यासाठी तयार झाले आहेत. (Champions Trophy 2025 Final India vs New Zealand)
आता या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज फिरकीपटू रवींद्र जडेजा दोघेही या फाॅरमॅटमधून निवृत्ती घेतील अशी चर्चा रंगत आहे. पण वास्तविक परिस्थिती पाहता ही फक्त चर्चा आहे, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर अश्या परिस्थितीत आपण जाणून घेऊयात की, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजासाठी खरच ही योग्य वेळ आहे का, वनडे फाॅरमॅटमधून निवृत्ती घेण्यासाठी? (Rohit Sharma and Jadeja future in cricket)
तर याचं उत्तर येईल होय, कारण रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे. तो एप्रिलमध्ये 38 वर्षांचा होईल. अश्या परिस्थितीत त्याची फिटनेस पाहता, तो 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळण्याची शक्यता फारच कमी आहे, शिवाय तो 2027 पर्यंत 40 वर्षांचा होईल. त्यामुळे तो आता करिअरच्या चांगल्या पाँइंटवर आहे. जे की त्याच्या निवृत्तीसाठी योग्य आहे. भारतीय संघ आगामी कसोटी अजिंक्यपदातून बाहेर झाल्याने रोहित शर्मा कसोटीत पुन्हा खेळण्याची शक्यता कमी आहे, शिवाय तो मागील काही काळात कसोटीत सपेशल फ्लाॅप ठरला आहे. तसेच त्याने टी20 मधूनही आधीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेऊ शकतो. (Rohit Sharma retirement news)
रोहितच्या वनडे कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत 272 सामने खेळल्या आहेत, ज्यातील 264 डावांत खेळताना त्याने 11092 धावा केल्या आहेत. तसेच रोहितने या फाॅरमॅटमध्ये 32 शतके आणि 57 अर्धशतके केल्या आहेत. (Rohit Sharma ODI career stats)
रवींद्र जडेजाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने देखील आधीच टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. त्याचे वय देखील 36 वर्ष आहे. जडेजाची फिटनेस चांगली असली तरी भारतीय संघ युवा फिरकीपटूंवर विश्वास ठेवत आहे. मॅनेजमेंट अक्षर पटेलवर जास्त विश्वास दाखवत आहे, त्यामुळे जर भारतीय संघाला मोठे यश मिळाले तर जडेजा देखील वनडे फाॅरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. पण तो कसोटी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. कारण तो आतापर्यंत 80 कसोटी खेळल्या आहेत, त्यामुळे तो आणखी 20 कसोटी खेळून निवृत्ती घेऊ शकतो. (Ravindra Jadeja ODI career stats) जडेजाने आतापर्यंत 203 वनडे सामने खेळल्या आहेत, ज्यातील 103 डावांत फलंदाजी करताना त्याने 2797 धावा केल्या आहेत, ज्यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने 195 डावात 230 विकेट्स घेतल्या आहेत. (Ravindra Jadeja retirement rumors)
विराट कोहलीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची फिटनेस पाहता तो आणखी काही वर्ष खेळू शकतो, शिवाय त्याचा फाॅर्म पाहता तो 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या परभवानंतर ऑस्ट्रेलियचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने निवृत्ती घेतली. तर आता किवी संघातून कोणी निवृत्ती घेईल असे वाटतं नाही, कारण संघाचा सर्वात वरिष्ठ खेळाडू केन विल्यमसन आहे. तो सध्या 34 वर्षांचा आहे. त्यामुळे तो आणखी खेळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय संघातील इतर खेळाडू त्याच्यापेक्षा लहान आहेत. संघ देखील चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे न्यूझीलंड संघातून कोणी निवृत्ती घेण्याची शक्यता फार आहे.
हेही वाचा-
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारताच्या विजयाचे सूत्रधार ठरतील का हे 4 खेळाडू?
दुबईतील खेळपट्टी भारतासाठी लाभदायक? मोहम्मद शमीने गौतम गंभीरच्या वक्तव्याला दिले उत्तर!
स्टीव स्मिथनंतर केन विलियमसनही क्रिकेटमधून निवृत्ती घेणार ? अफवा की वास्तव जाणून घ्या एका क्लिकवर






