---Advertisement---

टी20 मध्ये कोण मारणार बाजी? जाणून घ्या दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड

On: मंगळवार, जानेवारी 20, 2026 5:28 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर मालिकेतील पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता दोन्ही संघ 5 टी20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. दरम्यान कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहेत. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे या मालिकेतही तोडीस तोड खेळ पाहायला मिळू शकतो. दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ 25 वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने 14 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना अनिर्णित राहिला होता.

तर भारतात खेळताना दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ 11 वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान 7 सामने हे भारतीय संघाने जिंकले आहेत. तर 4 सामने हे न्यूझीलंडने जिंकले आहेत. हा रेकॉर्ड पाहिला तर, भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळतो. यावेळी भारतीय संघ हा रेकॉर्ड आणखी बळकट करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला मायदेशात 3-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच वनडे मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता न्यूझीलंडचा संघ भारतावर टी20 मालिका विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

वनडे मालिकेत शुबमन गिल भारतीय संघाचा कर्णधार होता. आता टी20 मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंगसारखे स्फोटक फलंदाज या संघात पुनरागमन करताना दिसून येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---