वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे 10 दिवस उरले आहेत. अशात विश्वचषकाबद्दल थेट इंग्लंडहून हैराण करणारी भविष्यवाणी समोर आली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ही भविष्यवाणी केली आहे. त्याने म्हटले आहे की, भारतीय संघाची फलंदाजी सध्या खूपच जबरदस्त दिसत आहे. त्यामुळे जो संघ भारताला हरवेल, तो विश्वचषकाची ट्रॉफी जिंकेल.
‘भारतीय संघ आपल्या खेळपट्टीवर खतरनाक ठरू शकतो’
भारतीय संघाचे (Team India) सर्व खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन आणि केएल राहुल यांच्यासह प्रत्येक भारतीय फलंदाज चांगल्या लयीत दिसत आहे. त्यामुळे मायकल वॉन (Michael Vaughan) यांना वाटते की, भारतीय संघ विश्वचषकात आपल्या खेळपट्ट्यांवर खतरनाक ठरू शकतो.
वॉन यांनी ट्वीट करत लिहिले की, “आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. जो पण संघ भारताला हरवेल, तो विश्वचषक जिंकेल. भारतीय खेळपट्ट्यांवर भारताची फलंदाजी खूपच जबरदस्त आहे. याव्यतिरिक्त त्यांचा गोलंदाजी विभागही खूपच जबरदस्त दिसत आहे. आता त्यांना फक्त एकच गोष्ट रोखू शकते आणि ती म्हणजे अपेक्षांचं ओझं.”
It’s quite clear to me .. Whoever beats #India will win the WC .. 👍 #INDvAUS .. India’s batting line up on Indian pitches is ridiculous .. Plus they have all the bowling options covered .. it’s the only the pressure of the burden that could stop them .. 👍
— Michael Vaughan (@MichaelVaughan) September 24, 2023
भारतीय संघाची जबरदस्त खेळी
भारतीय संघाने इंदोर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा 99 धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 399 धावांचा महाकाय डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही भारताची वनडेतील आतापर्यंतची सर्वोच्च खेळी राहिली आहे. पावसामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 33 षटकात 317 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान पार करण्यात त्यांचा घाम निघाला. संघ 28.2 षटकात 217 धावांवर सर्वबाद झाला.
यावेळी भारताकडून श्रेयस अय्यर (105) आणि शुबमन गिल (104) यांनी शतक ठोकले. यांच्याव्यतिरिक्त कर्णधार केएल राहुल (52), सूर्यकुमार यादव (नाबाद 72) यांनीही अर्धशतक साकारले. ईशान किशनने 31 धावा केल्या, तर रवींद्र जडेजा 13 धावांवर नाबाद राहिला.
विश्वचषकापूर्वी भारतीय संघ खूपच मजबूत दिसत आहे. संघ फलंदाजीसोबतच गोलंदाजी विभागातही फॉर्ममध्ये आहे. आता भारतीय संघ विश्वचषकात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (whoever beat india will win the world cup says former england cricketer michael vaughan)
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! आता विराटच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळणार अय्यर? शतकवीराचे उत्तर वेधतंय सर्वांचं लक्ष
कपिल देव किडनॅप? खळबळजनक पोस्ट करत गंभीरही म्हणाला, ‘ही क्लिप तुम्हालाही आली का?’