---Advertisement---

अर्जुन तेंडुलकरला का मिळाली मुंबई रणजी संघात स्थान, मुख्य निवडकर्त्यांनी दिले स्पष्टीकरण

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 8:26 AM
Arjun Tendulkar
---Advertisement---

भारतातील मानाची देशांतर्गत स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीला १३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज्यसंघ या स्पर्धेसाठी खेळण्यास सज्ज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई संघाची घोषणा करण्यात आली होती. २० जणांच्या मुंबई संघात अर्जुन तेंडुलकर यालाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला होता. आता याबद्दल मुंबई क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते सलील अंकोला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जुनने अद्याप प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वरिष्ठ स्तरावर पदार्पण केलेले नाही. मात्र आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याला पदार्पण करण्याची संधी असणार आहे. मुंबई क्रिकेट अससिएशनने अर्जूनला आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यासाठी घोषित केलेल्या संघात स्थान दिले आहे.

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी संवाद साधताना सलील अंकोला म्हणाले, “अर्जुन तेंडुलकर शानदार गोलंदाजी करत आहे. या काळात तो दुखापतग्रस्त झाला होता, पण दुखापतीतून सावरल्यानंतर त्याला जे काही सामने खेळायला मिळाले, त्यात त्याने चांगला खेळ दाखवला आहे. भविष्यातील खेळाडू म्हणून त्याला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे.”

मुंबई रणजी संघ दिल्ली आणि महाराष्ट्र विरूद्ध  पहिले दोन रणजी सामने खेळणार आहे.अर्जुन तेंडुलकरने यापूर्वी मुंबईच्या वरिष्ठ संघासोबत दोन टी20 सामने खेळले आहेत.

या रणजी मोसमातील मुंबईच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा पृथ्वी शॉ याच्याकडे सोपवली आहेत. फलंदाज तुषार देशपांडे दुखापतीमुळे यावेळी खेळू शकणार नाही. तसेच श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव हे मुंबई संघातील अनुभवी खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतील. त्याचबरोबर रोहित शर्मा सध्या दुखापतग्रस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ब्रेट लीची तेजतर्रार गोलंदाजी, मुलाचाही उडवलाय थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ

बिग ब्रेकिंग! यंग इंडियाची कमाल! तब्बल पाचव्यांदा कोरले आशिया चषकावर नाव

Bye Bye 2021 | ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---