आज रात्री होणाऱ्या चेल्सी विरुद्ध आर्सेनल या फुटबॉल सामन्याची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. अंतिम सामना असल्यामुळे उत्सुकता साहजिक आहे परंतु अशी ही काही कारणं आहेत ज्यामुळे हा सामना अगदी पहायलाच हवा.
आर्सेनल आपल्या विक्रमी १३ व्या विजयासाठी उत्सुक असेल तर चेल्सी तगडी टक्कर देऊन त्यांचा विजय अवघड कसा करता येईल याकडे लक्ष देऊन असेल.
१. जॉन टेरीची निवृत्ती
चेल्सीसाठी सदैव तत्पर असणारा खेळाडू जॉन टेरी आता या सामन्यानंतर चेल्सीच्या जर्सीमध्ये परत दिसणार नाही. चेल्सीसाठी हा त्याचा अंतिम सामना असेल आणि योगायोग म्हणजे एफए कप फायनल सारखा मोठा सामना खेळून तो अलविदा करणार आहे. प्रिमियर लीगचा किताब जिंकलेल्या टेरीसाठी हा विजय किती मोठा असेल याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही.
२. आर्सेन वेन्गरचा शेवटचा सामना..??
आर्सेनलच्या गेल्या काही काळातल्या खराब प्रदर्शनामुळे सतत वेन्गरवर ताशेरे ओढले जाऊ लागले होते. त्याच्या आर्सेनल सोबतच्या करारा विस्ताराबाबत देखील फ़ुटबाँल विश्वात अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. पण आता या सगळ्या गोष्टींना डावलत जर आर्सेनल जर विक्रमी १३व्यांदा जर विजय मिळू शकलं तर या चर्चेला पूर्णविराम मिळू शकेल.
३. मानाचा एफए कप
इंग्लिश फ़ुटबाँल मध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या एफए कपचा हा अंतिम सामना असल्यामुळे लोकांचे डोळे या सामन्यावर पहिल्यापासूनच आहेत. सद्य स्थितीत चेल्सी चं पारडं जास्त जड आहे असे वाटते आहे परंतु रेकॉर्डस् वरून आर्सेनल ८-५ असे पुढे आहे. आता नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे काळ सांगेल.
४. सांचेझ विरुद्ध हझर्ड
आर्सेनल आणि चेल्सीचे हे दोन मात्तबर खेळाडू आज काय जादू करतात त्यावर सर्वांची नजर असेल. २३ गोल आणि १० अस्सिट्स सह सांचेझ हा काय दर्जाचा खेळाडू आहे ते त्याने दाखवून दिले आहे. तसेच चेल्सीची अंतिम सामान्यांपर्यंतची वाटचाल हझर्डने सुखकर केली आहे असे म्हणता येईल.
आता हे मात्र पहावे लागेल की या सामन्यात कोणता क्षण ठरतोय सर्वात रोमहर्षक. आज रात्री १० वाजता कळेल कोण आहे एफए कपचा विजेता.