---Advertisement---

आयपीएल लिलावात कोणत्याही किंमतीत सुंदरला विकत घेऊ शकते सीएसके, वाचा यामागील कारणे

On: शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2024 11:51 AM
---Advertisement---

वॉशिंग्टन सुंदरचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले. वॉशिंग्टन सुंदरने 3 वर्षांनंतर पुनरागमन करताना पुण्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, आता आयपीएल 2025 मेगा लिलावात वॉशिंग्टन सुंदरवर पैशांचा पाऊस पडू शकतो. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्स वॉशिंग्टन सुंदरवर पैशांचा वर्षाव करू शकतो, असे मानले जात आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, चेन्नई सुपर किंग्ज कोणत्याही किंमतीत वॉशिंग्टन सुंदरला आपल्या ताफ्यात का घेऊ इच्छेल?

फिरकी गोलंदाजीला बळ मिळेल
चेन्नई सुपर किंग्ज ऐतिहासिकदृष्ट्या फिरकी गोलंदाजांवर अधिक अवलंबून आहे. वॉशिंग्टन सुंदर चेन्नई सुपर किंग्जचा भाग असेल तर चेन्नईच्या फिरकी गोलंदाजीला बळ मिळेल. विशेषत: वॉशिंग्टन सुंदरचा अलीकडचा फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे. पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट्स घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला लिलावात मोठी किंमत मिळू शकते. तसेच चेपॉकच्या संथ आणि फिरकी अनुकूल विकेटवर वॉशिंग्टन सुंदर विरोधी फलंदाजांसाठी घातक गोलंदाज ठरू शकतो.

अनुभवी आणि विश्वासार्ह खेळाडू
वॉशिंग्टन सुंदर दीर्घकाळापासून आयपीएलचा भाग आहे. याशिवाय तो भारताकडून खेळला आहे. वॉशिंग्टन सुंदरबद्दल असे म्हटले जाते की दबावाच्या परिस्थितीत तो स्वत:ला शांत ठेवतो. चेन्नई सुपर किंग्जला मोठ्या सामन्यांमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या क्षमतेचा फायदा होऊ शकतो. या कारणांमुळे, चेन्नई सुपर किंग्ज कोणत्याही किंमतीत वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करू इच्छित असेल.

प्रत्येक विभागात योगदान देण्याची क्षमता
भारतातील सर्वात तेजस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचा समावेश होतो. गोलंदाजीशिवाय हा खेळाडू फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. विशेषत: गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदर किफायतशीर षटके टाकण्यासाठी ओळखला जातो. वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूंवर धावा काढणे विरोधी फलंदाजांसाठी सोपे राहिलेले नाही. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जमध्ये वॉशिंग्टन सुंदर हा रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-अफगाणिस्तान संघात रंगणार सेमीफायनल थरार! कधी आणि कुठे होणार सामने

पहिल्या वनडेत भारताने विश्वविजेत्या न्यूझीलंडला केले चित, टी20 विश्वचषकातील पराभवाचा काढला वचपा
“बाबर आझम लवकरच पुनरागमन करेल”, पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---