शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या ४१ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला १० विकेट्सने पराभूत केले. या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने मुंबईचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंना आपली ७ क्रमांची जर्सी भेट म्हणून दिली.
कृणाल आणि हार्दिकचा धोनीच्या जर्सीबरोबरचा फोटो आयपीएलच्या तसेच चेन्नई आणि मुंबईच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला आहे. याआधीही धोनीने राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरला त्याची जर्सी भेट म्हणून दिली होती.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1319693605217337345
https://twitter.com/IPL/status/1318249912144863232
धोनीने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना जर्सी भेट देण्याबद्दल अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेक चाहत्यांनी धोनी शेवटचा आयपीएल हंगाम तर खेळत नाही ना, अशी शंका उपस्थित केली आहे. कारण याचवर्षी १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे कदाचीत धोनी अशा जर्सी खेळाडूंना भेट देत असण्यामागे आयपीएलमधूनही निवृत्ती हे एक कारण असावे, असे काही चाहत्यांना वाटत आहे.
https://twitter.com/akshayn48491841/status/1319695062951890944
https://twitter.com/DHONI_HANGOVER/status/1319695197631033345
https://twitter.com/sbjsjsnsjsjjsk/status/1319694048983019521
https://twitter.com/ara_vind/status/1319694726975598594
https://twitter.com/pvrambabu/status/1319702026125598720
https://twitter.com/vips1031/status/1319695542926995456
https://twitter.com/Erpraveen_aero/status/1319701109833932803
धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा आयपीएल हंगाम खराब ठरला आहे. त्यांनी साखळी फेरीतील ११ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई पराभूत झाली पण करन-ताहिरच्या जोडीने रचला मोठा विक्रम
चेन्नईविरुद्ध एकहाती सामना जिंकवून देणारा ईशान किशन म्हणतो, ‘त्या’ खेळाडूकडून नेहमीच शिकायला मिळते
‘पॉवरप्लेमध्येच खेळ संपला होता’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईच्या प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
ट्रेंडिंग लेख –
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला






