भारताची युवा महिला क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिग्स इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड वुमेन्स 2021′ लीगमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळत आहे. मंगळवारी (10 ऑगस्ट) जेमिमाह रॉड्रिग्सने तिने समालोचनामध्ये पदार्पण केले आणि यादरम्यान तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिले. पण तिच्या एका उत्तराने मात्र, सर्वांचेच लक्ष वेधले.
भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्सने इंग्लंडमध्ये द हंड्रेड 2021 मध्ये तिची उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. जेमिमाह रॉड्रिग्सने नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाकडून खेळताना 5 सामन्यांत 241 धावा केल्या आहेत आणि ती स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू आहे.
जेमिमाह रॉड्रिग्स मंगळवारी द हंड्रेडमध्ये मँचेस्टर ओरिजिनल आणि लंडन स्पिरिट संघामधील सामन्यात समालोचन करताना दिसली. या दरम्यान जेमिमाहला काही प्रश्न देखील विचारण्यात आले.
जेमिमाहला एक प्रश्न विचारण्यात आला की, तिचा आवडता यष्टिरक्षक कोण आहे? यावर जेमिमाने उत्तर दिले की, “ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्ट ” यानंतर मात्र, थोड्याच वेळात जेमिमाहने एमएस धोनीचे नाव देखील घेतले.
त्याचवेळी जेमिमाह म्हणाली की, “माझा आवडता यष्टिरक्षक ॲडम गिलख्रिस्ट आहे. माफ करा एमएस धोनी सुद्धा आहे. भारतात लोक मला मारतील”
जेमिमाह हंड्रेड टूर्नामेंटमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणारी एकमेव फलंदाज आहे. तिची फलंदाजी सरासरी 60 पेक्षा जास्त आहे आणि तिने 3 अर्धशतके केली आहेत. या स्पर्धेत जेमिमाह व्यतिरिक्त भारताची शेफाली वर्मा देखील बर्मिंगहॅम फिनिक्सकडून खेळत आहे आणि या स्फोटक फलंदाजाने 6 डावांमध्ये 29.40 च्या सरासरीने 147 धावा केल्या आहेत. तसेच हरमनप्रीत कौरने मँचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळताना 3 सामन्यांमध्ये 52 च्या सरासरीने 104 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स ठरणार विराटसाठी प्रेरणादायी; लवकरच झळकावणार शतक, दिग्गज इंग्लिश कर्णधाराची भविष्यवाणी,
शार्दुल ठाकूर लॉर्ड्स कसोटीतून बाहेर होताच वसीम जाफरने केलेलं ‘भन्नाट’ ट्विट होतंय तुफान व्हायरल






